कोविड-१९ मुळे महिलांच्या दारिद्य्र दरात वाढ

कोविड-१९ मुळे महिलांच्या दारिद्य्र दरात वाढ

  • २ सप्टेंबर, २०२० रोजी संयुक्त राष्ट्र महिला (UN Women)आणि संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रमाने नवीन आकडेवारी जाहीर केली. ज्यात असे म्हटले आहे की, सर्व देशभर असलेला कोविड-१९ हा स्त्रियांवर नकारात्मक परिणाम करेल आणि स्त्रियांचा दारिद्य्र दर वाढवेल.
  • ही माहिती  संयुक्त राष्ट्र महिलांद्वारे ‘इनसाइट टू अ‍ॅक्शन-COVID १९ च्या अनुषंगाने लिंग समानता’ या शीर्षकाच्या अहवालानुसार प्रकाशित केला आहे.
  • या महामारीमुळे या दशकाच्या अखेरीस दारिद्य्र निर्मूलनामुळे झालेल्या प्रगतीचा उलट परिणाम होईल आणि २०२१ पर्यंत सुमारे ९६ दशलक्ष लोकांना अत्यंत गरिबीत ढकलले जाईल. त्यातील सुमारे ४७ दशलक्ष या स्त्रिया व मुली असतील.
  • या अंदाजानुसार फक्त सकल देशांतर्गत उत्पादनांचे मोजमाप गृहित धरले जाते. यात मुलांची देखभाल व इतर जबाबदार्‍या यासाठी महिलांनी काम सोडले आणि गरिबीच्या लैंगिक वितरणावर  परिणाम होईल अशा बाबी गृहीत धरल्या जात नाहीत.
  • आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) चा अंदाज आहे की जून २०२० पर्यंत कोविड-१९ मुळे ७२% लोकांनी घरगुती कामकाजाच्या नोकर्‍या गमावल्या.
  • २०३० पर्यंत जगातील दारिद्य्र कमी करण्यासाठी जागतिक स्तरावरील जीडीपीच्या ०.१४% लागतील. (सुमारे २ ट्रिलियन डॉलर्स) तर लिंग गरीबीतील अंतर दूर करण्यासाठी सुमारे ४८ अब्ज डॉलर्स लागतील.

संयुक्त राष्ट्र महिलांविषयी :

  • कार्यकारी संचालक – फुम्झिले मॅलाम्बो – एन गकोका
  • मुख्यालय : न्यूयॉर्क, युनायटेड स्टेट्स् ऑफ अमेरिका

आंतरराष्ट्रीय कामगार संघटना (ILO) 

  • ILO ने २०१९ मध्ये त्याचा १०० वा वर्धापनदिन साजरा केला.
  • ही एकमेव त्रिपक्षीय संयुक्त राष्ट्र एजन्सी आहे.
  • स्थापना : ११ एप्रिल १९१९
  • मुख्यालय : जिनिव्हा, स्वित्झर्लंड
  • मिशन : सार्वभौम आणि शाश्वत शांततेसाठी सामाजिक न्याय आवश्यक आहे. 
  • ILO ही कामगार, महिला धोरण ठरवण्यासाठी आणि सर्व महिला आणि पुरुषांसाठी उपयुक्त कार्यक्रम तयार करण्यासाठी १८७ सदस्य देशांची संघटना आहे. जी सरकार, मालक आणि कामगार यांना एकत्र आणते.
  • आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यताप्राप्त मानवी आणि कामगार हक्कांना प्रोत्साहन देते.
  • १९६९ मध्ये या संघटनेला शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

Contact Us

    Enquire Now