WEF अहवाल – 2025 पर्यंत 85 दशलक्ष रोजगार कमी होतील

WEF अहवाल – 2025 पर्यंत 85 दशलक्ष रोजगार कमी होतील

  • जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या ‘the future of Jobs Report 2020’ अहवालाच्या तिसऱ्या आवृत्तीत COVID-19 महामारी व तांत्रिक प्रगतीमुळे 85 दशलक्ष रोजगारांवर गदा येण्याची शक्यता वर्तविली आहे.
  • हा अहवाल प्रत्येक दशलक्ष कर्मचारी असणाऱ्या 300 जागतिक कंपन्या व वरिष्ठ व्यवसायिकांच्या सर्वेक्षणानंतर बनला आहे.
  • पुढील 5 वर्षांमध्ये मशीन्स मधील स्वयंचलितीकरण व श्रमाचे नवीन विभाजनामुळे रोजगार विस्कळित होतील, व कामगारांची संख्या 15.4% वरून 9% पर्यंत घसरेल.
  • जवळपास 50% कर्मचाऱ्यांना ‘Re-skilling’ची आवश्यकता आहे. त्यानेच पुढील 5 वर्षांमध्ये त्यांचा रोजगार टिकू शकेल.
  • तांत्रिक प्रगतीमुळे आर्थिक विषमता वाढेल, ज्याचा प्रभाव सर्वाधिक कमी उत्पन्न कामगार, महिला व अकुशल कामगारांवर पडेल.

अहवालातील सूचना – 

  1. सरकारने असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा, शिक्षण मध्ये सुधारणा इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करणे.
  2. खासगी क्षेत्राने बेंचमार्क ठरवणे, प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे ज्याने कोणताही कामगार मागे राहणार नाही असे लक्ष्य ठेवणे.
  • WEF ने ‘20 markets of tomorrow’ या श्वेतपत्रिकेत ‘Jobs reset summit 2020’ मध्ये अर्थव्यवस्थांना सर्व समावेशक व टिकाऊ मार्गाने बदलणाऱ्या अनेक Antivirals, space flights इत्यादी मार्गांचा उल्लेख केला आहे. 
  • भारतामध्ये Solid Technological System आहे. तथापि मार्केटमध्ये टिकण्यासाठी भारताला सामाजिक व संस्थात्मक रचनेमध्ये विकासाची गरज आहे.

World Economic Forum (WEF)

  • सुरुवात = 1971
  • संस्थापक, CEO = क्लाऊस स्वाब 
  • मुख्यालय = cologny, (स्वित्झर्लंड)
  • जानेवारीच्या अखेरीस Davos येथे वार्षिक बैठक होते. ज्यात जगभरातील 3000 व्यावसायिक, अर्थतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय नेते 5 दिवसांसाठी जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतात.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now