WEF अहवाल – 2025 पर्यंत 85 दशलक्ष रोजगार कमी होतील
- जागतिक आर्थिक मंच (WEF) च्या ‘the future of Jobs Report 2020’ अहवालाच्या तिसऱ्या आवृत्तीत COVID-19 महामारी व तांत्रिक प्रगतीमुळे 85 दशलक्ष रोजगारांवर गदा येण्याची शक्यता वर्तविली आहे.
- हा अहवाल प्रत्येक दशलक्ष कर्मचारी असणाऱ्या 300 जागतिक कंपन्या व वरिष्ठ व्यवसायिकांच्या सर्वेक्षणानंतर बनला आहे.
- पुढील 5 वर्षांमध्ये मशीन्स मधील स्वयंचलितीकरण व श्रमाचे नवीन विभाजनामुळे रोजगार विस्कळित होतील, व कामगारांची संख्या 15.4% वरून 9% पर्यंत घसरेल.
- जवळपास 50% कर्मचाऱ्यांना ‘Re-skilling’ची आवश्यकता आहे. त्यानेच पुढील 5 वर्षांमध्ये त्यांचा रोजगार टिकू शकेल.
- तांत्रिक प्रगतीमुळे आर्थिक विषमता वाढेल, ज्याचा प्रभाव सर्वाधिक कमी उत्पन्न कामगार, महिला व अकुशल कामगारांवर पडेल.
अहवालातील सूचना –
- सरकारने असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा, शिक्षण मध्ये सुधारणा इत्यादी सुविधा उपलब्ध करण्यासाठी उपाययोजना करणे.
- खासगी क्षेत्राने बेंचमार्क ठरवणे, प्रशिक्षण कार्यक्रम राबवणे ज्याने कोणताही कामगार मागे राहणार नाही असे लक्ष्य ठेवणे.
- WEF ने ‘20 markets of tomorrow’ या श्वेतपत्रिकेत ‘Jobs reset summit 2020’ मध्ये अर्थव्यवस्थांना सर्व समावेशक व टिकाऊ मार्गाने बदलणाऱ्या अनेक Antivirals, space flights इत्यादी मार्गांचा उल्लेख केला आहे.
- भारतामध्ये Solid Technological System आहे. तथापि मार्केटमध्ये टिकण्यासाठी भारताला सामाजिक व संस्थात्मक रचनेमध्ये विकासाची गरज आहे.
World Economic Forum (WEF)
- सुरुवात = 1971
- संस्थापक, CEO = क्लाऊस स्वाब
- मुख्यालय = cologny, (स्वित्झर्लंड)
- जानेवारीच्या अखेरीस Davos येथे वार्षिक बैठक होते. ज्यात जगभरातील 3000 व्यावसायिक, अर्थतज्ज्ञ, आंतरराष्ट्रीय नेते 5 दिवसांसाठी जागतिक मुद्द्यांवर चर्चा करतात.