
UNCTAD अहवाल – जागतिक व्यापार मूल्य 7-9%नी घसरणार
- संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषदेच्या (UNCTAD) ‘Trade and development Report 2020’ अहवालात 2020 मध्ये जागतिक व्यापारात 7-9%नी घट होण्याची शक्यता वर्तविली आहे.
- अहवाल शीर्षक – from Global Pandemic to Prosperity for All : Avoiding another lost Decade
- 2019 च्या 3ऱ्या तिमाहीमध्ये 4.5% पेक्षा ही कमी प्रमाणात जागतिक व्यापारात वाढ झाली आहे.
- जगातील सर्व क्षेत्रात २०२० च्या दुसऱ्या तिमाही मध्ये COVID-19 महामारीमुळे व्यापारात एकूण 19% नी घट झाली आहे.
- अहवालाने 2020च्या 4थ्या तिमाहीमध्ये व्यापार वाढ 3% पेक्षा कमी असेल असे वर्तवले आहे.
- अहवालाने भारताची अर्थव्यवस्था 2020मध्ये 5.9%ने घसरण्याचाही अंदाज केला आहे.
चीनची निर्यात जोमाने परतली –
- चिनी उत्पादनांची मागणी 2ऱ्या तिमाही नंतर वाढली.
- म्हणून 3ऱ्या तिमाहीमध्ये चिनी निर्यात वाढून तिचा वार्षिक दर 10% वर पोहोचला आहे.
संयुक्त राष्ट्र व्यापार व विकास परिषद
UNCTAD = (United nations Conference on trade and Development)
- सुरुवात = 1964 – 30 डिसेंबर (सदस्य राष्ट्र = 195)
- मुख्यालय = जिनिव्हा, (स्वित्झर्लंड)
- सरचिटणीस = मुखिशा कितुयी (केनिया)
- Parent organisation = संयुक्त राष्ट्र आमसभा व संयुक्त राष्ट्र सचिवालय
- UNCTAD ची दुसरी सभा – 1968 ला भारतात नवी दिल्लीला झाली.
- 15वी सभा 2016 ला नैरोबी (केनिया) ला झाली.