SDG – शहरी निर्देशांक २०२०-२१ : निती आयोग
- निती आयोगाने २३ नोव्हेंबर २०२१ रोजी २०२१-२२ या वर्षीचा SDG शहरी निर्देशांक जाहीर केला.
- इंडो-जर्मन सहकार्य अंतर्गत हा निर्देशांक जाहीर करण्यात आला. २०२०-२१ ही आतापर्यंतची चौथी आवृत्ती आहे.
- प्रत्येक SDG साठी शहरी भागांना ०-१०० च्या दरम्यान गुणांकन केले जाते. १०० म्हणजेच २०३० साठीचा SDG प्राप्त होईल तर ० म्हणजेच हे लक्ष्य गाठण्यापासून शहरी भाग दूर आहे. शहरी भागांच्या एकूण कामगिरीचे मोजमाप करण्यासाठी हा निर्देशांक तयार केला जातो.
शहरी भागांची या निर्देशांकानुसार पुढील चार भागात वर्गीकरण करण्यात आले आहे.
१) Aspirant (०-४९)
२) Performer – (५०-६४)
३) front runner – (६५-९९)
४) Achiever – (१००)
- या निर्देशांकासाठी एकूण ५६ शहरी भागांची माहिती घेण्यात आली त्यामध्ये ४४ शहरी भागांचा समावेश १० लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या क्षेत्रामध्ये होतो.
निकाल
आघाडीचे शहरी क्षेत्र
क्षेत्र | राज्य/केंद्रप्रदेश | गुण |
१) शिमला | हिमाचल प्रदेश | ७५.५० |
२) कोईम्बतूर | तमिळनाडू | ७३.२९ |
३) चंदिगड | चंदिगड | ७२.३६ |
७) पुणे | महाराष्ट्र | ७१.२१ |
१०) नागपूर | महाराष्ट्र | ६९.७९ |
पहिल्या दहा आघाडीच्या शहरी क्षेत्रांत महाराष्ट्रातील पुणे आणि नागपूर यांचा समावेश
तळाकडील शहरी क्षेत्र
क्षेत्र | राज्य/केंद्रप्रदेश | गुण |
१) धनबाद | झारखंड | ५२.४३ |
२) मीरत | उत्तरप्रदेश | ५४.६४ |
३) इटानगर | अरुणाचलप्रदेश | ५५.२९ |
SDG (Sustainable Development Goals
- शाश्वत विकास लक्ष्ये
- २५ सप्टेंबर २०१५ रोजी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेने SDGsचा स्वीकार केला.
- त्याअंतर्गत १७ ध्येये आणि १६९ लक्ष्ये २०१६-३० या कालावधीसाठी स्वीकारण्यात आले.