NATGRID आणि राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग यांच्यात सामंजस्य करार

NATGRID आणि राष्ट्रीय गुन्हे नोंद विभाग यांच्यात सामंजस्य करार 

  • NATGRID (The National Intelligence Grid) ने राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाबरोबर केंद्रीकृत ऑनलाइन क्राईम अ‍ॅण्ड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टिम्स (CCTNS) डेटाबेस आणि प्रथम माहिती अहवाल (FIR) आणि चोरीच्या वाहनांचा तपशील मिळवण्यासाठी सामंजस्य करार केला.
  • CCTNS डेटाबेस एक व्यासपीठ आहे जे सुमारे १४ हजार पोलिस स्टेशनला जोडते. सर्व राज्य पोलिसांना प्रथम माहिती अहवाल CCTNS मध्ये दाखल करणे अनिवार्य आहे.
  • CCTNS डेटाबेस वापरण्याची संधी मिळाल्यामुळे NATGRID हे गुप्तचर (Intelligence) आणि तपास यंत्रणेच्या गरम यांचा दुवा म्हणून काम करेल व बँकेच्या आणि टेलिफोनच्या तपशील अशी संबंधित डेटाबेस ही सुरक्षित व्यासपीठांवरून मिळवता येईल.

NATGRID ची गरज :

  • सध्याच्या व्यवस्थेनुसार सुरक्षा एजन्सी संशयिताच्या खुणांसाठी थेट विमान कंपन्या किंवा दूरध्वनी कंपन्यांना संपर्क करतात. सर्व माहिती डेटा हा गूगल इत्यादी आंतरराष्ट्रीय सर्व्हरद्वारे सामायिक केला जातो.
  • NATGRID याची खात्री करेल की अशी माहिती सुरक्षित मंचाद्वारे सामायिक केली जाईल व त्यास गळतीपासून संरक्षण देईल. 
  • विशेष म्हणजे, राज्य पोलीस NATGRID चा भाग नसतील आणि माहितीसाठी ते थेट विमान कंपन्या किंवा रेल्वेशी संपर्क साधू शकतील.

NATGRID बद्दल :

  • या प्रकल्पाची प्रथम कल्पना काँग्रेसच्या पलानियप्पन चिदंबरम यांच्या अंतर्गत झाली होती. नंतर गृहमंत्री अमित शहा यांच्या अंतर्गत परत नव्याने सुरुवात झाली.
  • २८०० कोटी रुपयांच्या बजेटपासून सुरू झालेला हा प्रकल्प गुप्तचर विभाग आणि अनुसंधान व विश्लेषण विंग (Research and Analysis Wing) यांसारख्या किमान १० केंद्रीय एजन्सीजचे सुरक्षित व्यासपीठावरून माहिती मिळवण्याचे माध्यम ठरेल.
  • सर्व माहिती टेलिकॉम, टॅक्स रेकॉर्ड, बँक, इमिटेशन यांसारख्या २१ संस्थांकडून NATGRID खरेदी करेल.

राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाबद्दल (NCRB : National Crime Records Bureau) 

  • NCRB ची स्थापना ११ मार्च १९८६ साली झाली असून त्याचे मुख्यालय दिल्लीला आहे.
  • NCRB हे गृहमंत्रालयाअंतर्गत काम करते तर राम फल पवार हे NCRB चे संचालक आहेत.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now