IAS अधिकारी उषा पाध्ये या नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोच्या पहिल्या महिला महासंचालक (DG)

IAS अधिकारी उषा पाध्ये या नागरी उड्डाण सुरक्षा ब्युरोच्या पहिल्या महिला महासंचालक (DG) 

  • नागरी उड्डाण मंत्रालयाच्या सहसचिव उषा पाध्ये यांना नागरी विमान वाहतूक सुरक्षा ब्युरो (BCAS) च्या महासंचालक पदाचा अतिरिक्त कारभार देण्यात आला.
  • या पदावर नियुक्त झालेल्या त्या पहिल्या महिला व तिसर्‍या IAS अधिकारी आहेत.
  • विमान वाहतूक सुरक्षा मंडळाचे महासंचालकपद सहसा IPS अधिकार्‍यांकडे असते. यापूर्वी IPS अधिकारी राकेश अस्थाना यांना BCAS चा प्रभार देण्यात आला होता. आता त्यांना सरदार सुरक्षा दलात (BASF) महासंचालक म्हणून हलविण्यात आले आहे.
  • १९८७ मध्ये DJCA मध्ये सेल म्हणून तयार झालेली BCAS संघटना आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानदंडाची अंमलबजावणी करण्यासाठी कार्यरत आहे.

उषा पाध्ये यांच्याबद्दल :

  • उषा पाध्ये या १९९६ च्या बॅचच्या ओदिशा केडरच्या IAS अधिकारी आहेत.
  • जुलै २०१५ मध्ये नागरी उड्डाण मंत्रालयात सहसचिव म्हणून केंद्रीय सेवेवर त्यांची नेमणूक झाली.
  • उषा यांचा केंद्रीय प्रतिनियुक्ती कार्यकाळ १६ जुलै २०२२ रोजी संपणार आहे. त्यांचे पती अरविंद पाधी हे ओदिशा केडरचे IAS अधिकारी असून आता रसायन व खत मंत्रालयात सहसचिव म्हणून कार्यरत आहेत.
  • उषा यांनी केंद्रीय सेवेत प्रतिनियुक्त होण्यापूर्वी ओदिशा सरकारचे सचिव, शाळा व मास शिक्षण म्हणून काम पाहिले.

Contact Us

    Enquire Now