H10N3 बर्ड फ्लूचा चीनमध्ये पहिला मानवी रुग्ण
- चीनच्या झेनजियांगमधील एका ४१ वर्षीय माणसात एच १० एन ३ हा बर्ड फ्लूचा विषाणू आढळून आला.
- मानवात हा विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे चीनच्या राष्ट्रीय आरोग्य आयोगाने घोषणा केली आहे.
एच १० एन ३
- हा इन्फ्लूएन्झा ए व्हायरसचा उपप्रकार असून मुख्यत्वे वन्य पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये आढळून येतो.
- एच १० एन ३ हा स्ट्रेन अधिक शक्तिशाली नसून मोठ्या प्रमाणावर फैलावण्याचा धोकाही कमी आहे.
प्रसार
- संसर्ग झालेल्या पक्ष्यांच्या लाळ, थुंकीतून या विषाणूचा प्रसार होतो.
- मानवात डोळा, नाक व तोंडाद्वारे किंवा हवेतून संसर्गित थेंब अथवा धूळ शरीरात गेल्यास मानवाला या विषाणूची लागण होते.
- पोल्ट्रीमध्ये काम करणाऱ्या व्यक्तींना बर्ड फ्लूच्या स्ट्रेनची बाधा होण्याची शक्यता अधिक असते.
प्रतिबंधक उपाय
- पक्षी, तसेच आजारी किंवा मृत कोंबड्याचा संपर्क टाळावा.
- मास्क घालणे अनिवार्य
- स्वच्छ ठिकाणांहून मांसाहार खरेदी करावा.
- तसेच WHO नुसार, मांस, अंडी, चिकन किमान ७० सेल्सिअसपर्यंत तापमानावर शिजवून खावीत.
इन्फ्लुएन्झा विषाणूचे प्रकार
- इन्फ्लूएन्झा विषाणूचे तीन प्रकार केले जातात : ए, बी, सी
अ) इन्फ्लुएन्झा ए : (झूनॉटिक) – मोठ्या प्रमाणात प्राणी व पक्ष्यांमध्ये आढळतो.
-
- उपप्रकार : H5N1, H7N9, H9N2, H10N3
ब) इन्फ्लुएन्झा बी आणि सी : मानवामध्ये संक्रमण ज्यामुळे सौम्य आजार उद्भवतात.
वर्गीकरण :
- हेमॅग्लूटिनिन (एचए) आणि न्यूरामिनिडेस (एनए) या दोन पृष्ठभागावरील प्रथिनांच्या आधारे इनफ्लूएन्झा विषाणूचे उपप्रकार पडतात.
- उदा. एचए 7 प्रोटीन आणि एनए 9 प्रोटीन = H7N9
- H5N1 हा अत्यंत घातक एव्हिएन इन्फ्लूएन्झा विषाणू असून मुख्यत्वे पक्ष्यांमध्ये आढळून येतो.