DRDO ने ‘अभ्यास’ची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली
- डिफेन्स रीसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (DRDO) ने ओदिशाच्या बालासोरच्या अंतरिम चाचणी रेंजमधून ‘हाय-स्पीड एक्स्पेंडेबल एरियल टार्गेट (HEAT) ‘अभ्यास’ची यशस्वी उड्डाण चाचणी घेतली.
- ‘अभ्यास’चा उपयोग विविध क्षेपणास्त्र यंत्रणेच्या मूल्यांकनासाठी लक्ष्य म्हणून केला जाऊ शकतो.
- ‘अभ्यास’ DRDO च्या एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट आस्थापनाद्वारे डिझाइन व विकसित केले गेले आहे.
- ‘अभ्यास’ एअर व्हिकलन ट्विन अंडरलॉग बूस्टर वापरून लाँच केले गेले आहे. मार्गदर्शन आणि नियंत्रणासाठी फ्लाइट कंट्रोल कॉप्युटर (FCC) सोबत इटर्नल नॅव्हिगेशन सिस्टिम (INS) आहे.
- वाहन तपासणी लॅपटॉप-आधारित ग्राऊंड कंट्रोल स्टेशन (GCS)चा वापर करून केली जाते.
‘अभ्यास’बद्दल :
- हे स्वायत्त उड्डाण करण्यासाठी डिझाइन केले आहे. (ऑटोपायलटच्या मदतीने)
- चाचणी मोहिमेदरम्यान ५ किमी उंची, वाहनाची गती ०.५ मॅक, ३० मिनिटांची सहनशक्ती आणि चाचणी वाहनाची २G टर्न क्षमता यशस्वीरित्या प्राप्त झाली.
DRDO बद्दल
- DRDO अध्यक्ष – डॉ. जी. सतीश रेड्डी
- DRDO मुख्यालय – नवी दिल्ली