30 व 31 जुलैला भारत आणि इंडोनेशियाच्या नौदलांमध्ये हिंदी महासागर प्रदेशात CORPAT(Coordinated Patrol ) सराव पार पडला. या सरावाची ही 36 वी आवृत्ती होती.
या सरावामध्ये भारतीय बनावटीची गस्तीनौका INS सरयू इंडोनेशियाची KRI bung tomo या जहाजांनी भाग घेतला होता.
दोन्ही नौदलांमध्ये सागरी सहकार्य वाढवणे आणि इंडो-पॅसिफिक क्षेत्रामध्ये मैत्रीचे दृढ बंधन निर्माण करणे हा उद्देश सदर सरावाचा होता. हा सर्व प्रामुख्याने गस्ती (patrol) शी संबंधित आहे.
कोविड महामारीचा प्रादुर्भाव बघता एकमेकांच्या संपर्कात न येता केवळ समुद्रात (A non-contact, at sea only) हा सराव घेण्यात आला.
सागर प्रकल्पाअंतर्गत [SAGAR- Security And Growth for All in the Region] हिंदी महासागराच्या किनाऱ्यावर असणाऱ्या देशांशी सहकार्य करून या प्रदेशामध्ये सुरक्षा वाढवण्याचा भारताचा मानस आहे.
2015 मध्ये हिंदी महासागरातील आपल्या शेजाऱ्यांशी आर्थिक व संरक्षणात्मक सहकार्य वाढवण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सागर प्रकल्प सुरू केला.
2002 पासून CORPAT सरावाची सुरुवात झाली आणि तो वर्षातून दोनदा घेण्यात येतो.
समुद्र शक्ती : भारत इंडोनेशियाच्या नौदलांमध्ये होणारा युद्ध अभ्यास
गरुड शक्ती : भारत इंडोनेशियाच्या सैन्यामध्ये होणारा भूदल युद्ध अभ्यास