83 तेजस लढाऊ विमान खरेदीस सरकारची मंजुरी

83 तेजस लढाऊ विमान खरेदीस सरकारची मंजुरी

 • मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक समितीची (सीसीएस) बैठक झाली, त्यात स्वदेशी बनावटीच्या 83 तेजस (MK-1A) विमाने खरेदीस मंजुरी देण्यात आली आहे.
 • यात 73 तेजस एमके-वन ए लढाऊ विमाने आणि 10 तेजस एमके-वन ट्रेनर विमानांचा समावेश आहे.
 • चीन आणि पाकिस्तानशी असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर युद्धसज्जता आणि भारतीय वायुदलाची शक्ती वाढविण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • संरक्षण उत्पादन क्षेत्रात आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल.
 • तेजस (MK-1A) : (Light Combat Aircraft)
 • वैशिष्ट्ये – लांबी – 13.2 मीटर, उंची – 4.4 मीटर
 • वजन : 6560 किलो
 • वेग : 1.6 मॅक (2200 किमी प्रति तास)
 • क्षमता : 50 हजार फूट उंचीवरून सलग 3850 किमी उड्डाण
 • चौथ्या पिढीतील सुपरसॉनिक लढाऊ विमान समूहातील सर्वात हलके आणि छोटे विमान
 • निर्मिती : हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेड, बंगळूरू आणि एअरोनॉटिकल डेव्हलपमेंट एजन्सी (एडीए)
 • इतर बाबी : लेझरच्या सहाय्याने क्षेपणास्त्र सोडण्याची क्षमता
 • इस्रायललचे अत्याधुनिक रडार
 • तेजसद्वारे बीव्हीआर
 • विमानवाहू नौकेवरून उड्डाण तसेच उतरण्याची क्षमता
 • हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यासाठी
 • लेझर गाइडेड मिसाईल असून शत्रूंचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी उपयोग.
 • विमान निर्मितीसाठी 60% भारतीय तंत्रज्ञानाचा वापर.
 • खरेदीसाठी 45,696 कोटी रुपये खर्च. त्यात पायाभूत सुविधांच्या विकासावरील 1202 कोटी रुपयांचा समावेश.

Contact Us

  Enquire Now