83 टक्के बालके उपचाराविना –
- विकासात्मक वाढीमध्ये सदोष असलेल्या बालकांचे निदान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत (आरबीएसके) वेळेत केले जाते.
- मात्र, तज्ज्ञांकडून तपासणी आणि प्रत्यक्ष उपचार हा प्रवास पालकांसाठी खडतर असल्याने जवळपास 83 टक्के बालकांवर उपचार सुरू न झाल्याचे संशोधन अभ्यासातून निदर्शनास आले आहे.
- प्राथमिक आरोग्य केंद्रावर या मुलांसाठी पुनर्वसन केंद्राची सुविधा उपलब्ध करण्याची गरज या अभ्यासातून अधोरेखित केली.
- पुण्यातील ग्रामीण विभाग आणि महानगरपालिकेतील जन्मत: सदोष असलेल्या 115 बालकांच्या पालकांसोबत ‘बर्थ डिफेक्ट ॲण्ड चाइल्डहूड डिसॅबिलिटी सेंटर’ या संस्थेने हा अभ्यास केला.
- तो डिसॅबिलिटी, सीबीआर ॲण्ड इन्क्लूझिव डेव्हलपमेंट या नियतकालिकात नुकताच प्रसिद्ध झाला आहे.
बालकांमधील दोष
- जनुकीय आजार, कर्णबधीर, मूकबधीर, बौद्धिक विकास, ऑटिझम, सेरेब्रल पाल्सी, अंधत्व इत्यादी विकासात्मक वाढीत सदोष असलेल्या बालकांच्या पालकांचा यात समावेश केला आहे.
- यातील 55 टक्के पालकांना आरबीएसकेच्या तपासणी आधीही मुलामध्ये दोष असल्याचे ज्ञात होते तरी यातील 60 टक्के पालकांनी उपचार सुरू केले होते किंवा उपचार सुरू करून अर्धवट सोडले होते.
- परंतु 39 टक्के पालकांनी सुविधा उपलब्ध नसल्याने उपचार न केल्याचे नोंदविले आहे.
- 115 मधील 38 बालकांना जन्मजात हृद्रोग असल्याचे निदान झाले असून यातील 60 टक्के बालकांवर उपचार सुरू झाले होते.
- परंतु विकासात्मक वाढीत सदोष असलेल्या (29 पैकी 24) म्हणजेच 83 टक्के बालकांवर कोणतेही उपचार सुरू झालेले नाहीत.
- यातील बहुतांश बालके हे 10 वर्षांची आहेत.