2024च्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचे पदार्पण –
- ब्रेकडान्सिंगला अधिकृत ऑलिम्पिक क्रिडा प्रकार म्हणून मान्यता देण्यात आली असून पॅरिसला 2024 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत ब्रेकडान्सिंगच्या समावेशाचा निर्णय आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) घेतला आहे.
- युवा पिढीला ऑलिम्पिककडे मोठ्या प्रमाणात आकर्षित करण्यासाठी रस्त्यावरील नृत्याला म्हणजेच ‘स्ट्रीट डान्स’ला मान्यता देण्यात आली.
- त्यानुसार 2024 मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंगचा समावेश असेल.
- याआधी टोकियो ऑलिम्पिकमधून स्केट बोर्डिंग, क्लायम्बिंग आणि सर्फिंग या खेळांचे पदार्पण होणार होते, मात्र कोविड-19 मुळे यावर्षीची ऑलिम्पिक स्पर्धा 2021 पर्यंत लांबणीवर टाकण्यात आली.
- यास्थितीत स्केटबोर्डिंग, क्लायम्बिंग आणि सर्फिंग या तिन्ही खेळांना पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्थान देण्यात आले आहे.
- ब्रेकडान्सिंगबद्दल –
- ब्रेकडान्सिंगला ऑलिम्पिकमध्ये ‘ब्रेकिंग’ हे नाव देण्यात आले आहे.
- अमेरिकेत या खेळाचा 1970च्या दशकात उदय झाला होता.
- ह्युनस आयर्स येथे 2018च्या युवा ऑलिम्पिकमध्ये ब्रेकडान्सिंग या खेळाची चाचणी पार पडली होती.
- त्यानंतर पॅरिस ऑलिम्पिकच्या संयोजकांनी या खेळाचा समावेश करण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता.
- आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (IOC) –
- स्थापना – 23 जून 1984 (126 वर्षांपूर्वी)
- मुख्यालय – लोझान, स्वित्झर्लंड.
- सदस्यत्व – 105 सक्रिय सदस्य, 45 सन्माननीय सदस्य, 2 सन्मान सदस्य (सेनेगल आणि अमेरिका), 206 वैयक्तिक राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या.
- अधिकृत भाषा- फ्रेंच (संदर्भ भाषा) इंग्रजी आणि आवश्यक असल्यास यजमान देशाची भाषा.
- मानद अध्यक्ष – जॅक रोग
- अध्यक्ष – थॉमस बाख.
- महासंचालक – ख्रिस्तोफ डी केपर.
- संस्थापक – प्येर दे कुबेर्ती (फ्रेंच इतिहासकार व शिक्षणवादी)
- कुबेर्ती यांना आधुनिक ऑलिम्पिक स्पर्धेचे जनक मानले जाते.
- समितीच्या नव्या मुख्यालयाचे छत वैश्विक शांततेचे प्रतिक असलेल्या कबुतराच्या आकाराचे बनविण्यात आले आहे.