2020-21 या वर्षात भारतात सर्वाधिक 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परदेशी गुंतवणूक
- भारतातील थेट परदेशी गुंतवणूक वाढवण्यासाठी सरकारने केलेल्या धोरणात्मक सुधारणा, गुंतवणूक सुलभता व व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिणाम म्हणून देशात केल्या गेलेल्या परदेशी गुंतवणुकीत वाढ झाली आहे.
- 2020-21 या वर्षात भारतामध्ये आत्तापर्यंतची सर्वात जास्त म्हणजे 81.72 अब्ज अमेरिकन डॉलर्स थेट परदेशी गुंतवणूक (FDI) करण्यात आली.
- हा आकडा गेल्या वर्षीपेक्षा म्हणजे आर्थिक वर्ष 2019-20 मधील 74.39 अब्ज अमेरिकन डॉलर्स गुंतवणुकीपेक्षा 10 टक्क्यांनी जास्त आहे.
- कंपनी भागभांडवल आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये झालेली थेट परदेशी गुंतवणूक (FDI) (59.64 अब्ज अमेरिकन डॉलर्स) ही गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 19 टक्क्यांनी वाढली आहे. (49.98 अब्ज अमेरिकन डॉलर्स)
- आर्थिक वर्ष 2020-21 साठी या परदेशी गुंतवणूकदारांमध्ये प्रथम क्रमांकावर सिंगापूर (29%), दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका (23%) आणि तिसऱ्या क्रमांकावर मॉरिशस (9%) आहे.
- आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कॉम्प्युटर हार्डवेअर व सॉफ्टवेअरच्या क्षेत्रात सर्वात जास्त गुंतवणूक झाली असून भागभांडवलातील एकूण थेट परदेशी गुंतवणुकीपैकी 44% गुंतवणूक या क्षेत्रात झाली आहे.
- त्याखालोखाल बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 13% व त्यानंतर सेवाक्षेत्रात 8% इतकी गुंतवणूक झाली आहे.
- आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात झालेल्या गुंतवणुकीत गुजरातचा 78% कर्नाटक 9% आणि दिल्लीचा 5% वाटा आहे.
- 2020-21 या आर्थिक वर्षात भागभांडवलात झालेल्या एकूण गुंतवणुकीपैकी गुजरातला सर्वात जास्त म्हणजे 37% त्याखालाेखाल महाराष्ट्राला 27% व कर्नाटकला 13% गुंतवणूक प्राप्त झाली.
- आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये गुजरातला प्राप्त झालेल्या भागभांडवलात सर्वाधिक वाटा (94%) कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्रात असून बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्रात 2% इतका वाटा होता.
- गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 2020-21 या आर्थिक वर्षात बांधकाम (पायाभूत सुविधा) क्षेत्र, कॉम्प्युटर सॉफ्टवेअर व हार्डवेअर क्षेत्र, रबरी वस्तू, किरकोळ बाजारपेठ, औषधे व विद्युत उपकरणे या क्षेत्रातील गुंतवणूक 100 टक्क्यांनी वाढली आहे.
- सर्वात मोठ्या 10 परदेशी गुंतवणूकदारांमध्ये सौदी अरेबिया पहिल्या स्थानावर आहे.
- गेल्या आर्थिक वर्षातील 89.93 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सच्या तुलनेत या 2020-21 च्या आर्थिक वर्षामध्ये सौदी अरेबियाने 2816.08 दशलक्ष अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
- आर्थिक वर्ष 2019-20च्या तुलनेत आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये अमेरिकेने केलेल्या गुंतवणुकीत 227 टक्क्यांची तर इंग्लंडने केलेल्या गुंतवणुकीत 44 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे.