2020-21 या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 7.3 टक्क्यांनी घट

2020-21 या आर्थिक वर्षात जीडीपीमध्ये 7.3 टक्क्यांनी घट  

  • कोरोना महामारीचा पहिल्या लाटेचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसल्याने अर्थव्यवस्थेने गेल्या 40 वर्षांतील निराशाजनक कामगिरी केली आहे.
  • 2020-21 या आर्थिक वर्षात देशांतर्गत एकूण उत्पादनात उणे (-) 7.3 टक्क्यांनी घट झाली. 
  • चाळीस वर्षांपूर्वी 1979-80 या वर्षात विकास दर उणे (-) 5.3 टक्के घसरण झाली होती.
  • 2019-20 या आर्थिक वर्षात 4 टक्क्यांनी वाढ झाली होती.
  • कडक लॉकडाऊनमुळे पहिल्या टप्पयातच म्हणजे एप्रिल ते जून 2020 दरम्यान विकास दर थेट उणे 24.4 टक्के नोंदला गेला होता.
  •  तिसऱ्या तिमाहीत त्याने 16 टक्क्यांच्या रूपात थोडी उभारी घेतली होती.
  • राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या मते 2020-21 या आर्थिक वर्षातील उणे विकास 8 टक्के तर रिझर्व्ह बँकेच्या उणे 7.5 टक्के अंदाजानजीक आहे.
  • राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार भारताचा रिअल  जीडीपी मार्च 2020 अखेरच्या 145 कोटींवरून 2021 मध्ये 135 लाख कोटींपर्यंत कमी झाला.
  • कोविडच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने ग्राहकांच्या मागणीत प्रचंड घसरण झाल्याने बेरोजगारीचा दर 14.73 टक्क्यांसाठीच्या उच्चांकापर्यंत पोचत असल्याने सरकारसमोर मोठी आव्हाने आहेत.
  • देशाच्या अर्थव्यवस्थेत ग्राहकांच्या मागणीचा तब्बल 55 टक्के हिस्सा आहे. त्यात मोठी घसरण झाल्याने ही घसरण भारतीय अर्थव्यवस्थेसमोर विपरित परिणाम करणारी असेल.

 

अ.क्र. वर्ष जीडीपीचा दर
1 2012-13 5.5%
2 2013-14 6.4%
3 2014-15 7.4%
4 2015-16 8.0%
5 2016-17 8.3%
6 2017-18 6.8%
7 2018-19 6.5%
8 2019-20 4.0%
9 2020-21 (-) 7.3%

(चार दशकात झालेली पहिलीच उणे घसरण आहे.)

 

Contact Us

    Enquire Now