18 वर्षांवरील सर्वांना लस
- कोरोनाचा वेगाने फैलाव होत असल्याने केंद्र सरकारने लसीकरणाची व्याप्ती वाढविताना 18 वर्षांवरील सर्वांना लस देण्याची घोषणा केली.
- लसीकरणाचा हा चौथा टप्पा 1 मे पासून सुरू होणार असून केंद्राने राज्ये, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापनांना थेट निर्मात्यांकडून लसमात्रा घेण्यास मुभा दिली आहे.
- केंद्राच्या नव्या लसीकरण धोरणानुसार, लसनिर्माते मासिक 50 टक्के लसी केंद्र सरकारला तर उर्वरित 50 टक्के लसी राज्य सरकार आणि खुल्या बाजारात विकू शकतात.
- लसनिर्मात्या कंपन्यांना, राज्यांना व खुल्या बाजारात विक्री करण्यात येणाऱ्या 50 टक्के लसींच्या किंमतीबाबत आधी घोषणा करणे बंधनकारक आहे.
- त्या आधारे, राज्य सरकारे, खासगी रुग्णालये, औद्योगिक आस्थापने लसींची मागणी नोंदवू शकतील.
लसीकरणाचे टप्पे
- कोरोना प्रतिबंधक लसीकरणास राज्यासह देशात 16 जानेवारीला प्रारंभ झाला.
- पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना आणि दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना लसीकरण सुरू करण्यात आले.
- 1 मार्चपासून चालू झालेल्या तिसऱ्या टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांसह 45 वर्षांपुढील सर्व सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लसीकरण करण्यास सुरुवात झाली.