स्रीहत्येविरुद्ध लढा

स्रीहत्येविरुद्ध लढा :

  • दक्षिण आशियातील एक तृतीयांश महिलांना कौटुंबिक संरचना, व्यापक सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक, चौकटी तसेच परंपरागत रूढी त्याचबरोबर महिलेचा महिलेकडूनच होणाऱ्या हिंसाचारास सामोरे जावे लागते.
  • स्त्रीहत्या : लिंग या कारणावरून स्त्रीची केलेली हत्या या कृतीस स्त्रीहत्या म्हणतात. यात विविध प्रकारच्या कृतींचा समावेश होतो.

१) कौटुंबिक हिंसाचार : सगळ्यात अलिकडील राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की, भारतात ३४ टक्के १५ ते ४९ वयोगटातील महिलांनी कधीतरी हिंसा अनुभवली आहे. त्यात विशेषत: १५ वर्षांवरील वयोगटातील ३७ टक्के विवाहित महिलांचा समावेश होतो.

२) हुंड्यामुळे हत्या : याचा प्रत्यक्ष संदर्भ मुलीचे विवाहाचे वय, शिक्षण, समाज माध्यमांशी संपर्क यांच्याशी आहे; कमी स्त्रीसाक्षरता असलेल्या राज्यांमध्ये हा प्रकार सगळ्यात जास्त आढळतो. जवळपास ८९८ बालविवाह हे चाईल्ड हेल्पलाइन (१०९८) द्वारा लॉकडाऊन काळात थांबविण्यात आले.

३) स्त्रीभ्रूण हत्या : गेल्या दोन दशकांत अंदाजे १० दशलक्ष स्त्रीभ्रूण हत्या झाली आहे. याचे मुख्य कारण लिंग पक्षपात आणि लिंग-निश्चित तंत्रज्ञान हे आहे.

४) ऑनलाइन हिंसा  : ६० टक्के मुली आणि महिला ऑनलाइन हिंसेचा शिकार होत आहेत.

  • स्त्रीहत्येला प्रतिसाद :

१) हुंडा प्रतिबंधक कायदा, १९६१

२) गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्ण निदानतंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, १९९४

३) स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांना ३३ टक्के आरक्षण

४) २०२० मध्ये महिलांचा संसदेतील सहभागासंदर्भात भारताचा १९३ देशांत १४२ क्रमांक लागतो.

५) २०१९च्या निवडणुकीनुसार ७८ (१४.४ टक्के) महिला खासदार निवडून आल्या.

महिलांसाठी आधार सेवा :

  • पीडित महिलेस सुरक्षित राहण्यायोग्य जागा, आरोग्यसेवा, सामाजिक आधारसेवा यांसारख्या पायाभूत सेवा पुरविणे.
  • आधार सेवांद्वारा त्यांना त्यांच्या हक्कांविषयी शिक्षित करण्याची मुख्य भूमिका पार पाडावी.
  • सध्या फक्त १ टक्का महिला त्यांच्यावरील हिंसाचाराची नोंद करतात.
  • गैरसरकारी संस्था तसेच कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या संस्था समाजास महिलांचे हक्क व त्यांचे समाजातील महत्त्व याविषयी शिक्षित करण्यास प्रयत्नशील आहेत.
  • जर कोणी ऑनलाईन गुंडागिरी किंवा छळ करत असेल, तर त्याची तक्रार गृह मंत्रालयांतर्गत असणाऱ्या नॅशनल सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवर नोंद करावी.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now