सरकारकडे अधिशेषाचे होणाऱ्या हस्तांतरणात भारत दुसऱ्या क्रमांकावर

सरकारकडे अधिशेषाचे होणाऱ्या हस्तांतरणात भारत दुसऱ्या क्रमांकावर 

  • अहवाल – स्टेट ऑफ इकॉनॉमी
  • अहवाल प्रकाशित करणारी संस्था – रिझर्व्ह बँक
  • प्रसिद्ध – जून, 2021
  • 2020-21 आर्थिक वर्षात रिझर्व्ह बँकेने जीडीपीच्या 0.44 टक्के सरकारकडे हस्तांतरित केले आहे.
  • या अहवालानुसार, भारताचा तुर्कीनंतर सरकारकडे हस्तांतरित होणाऱ्या अधिशेषाच्या वाट्यात दुसरा क्रमांक लागतो.

अधिशेष हस्तांतरणांतर्गत पहिले 5 देश:

क्रमांक देश हस्तांतरित अधिशेष (जीडीपीच्या टक्केवारीनुसार)
1 तुर्की 0.50%
2 भारत 0.44
3 मलेशिया 0.26%
4 स्वीडन 0.13%
5 केनिया 0.04%

अहवालाची वैशिष्ट्ये

  1. आयएमएफच्या वर्ल्ड इकॉनॉमिक आऊटलूक तसेच मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक अहवालाचा आधार घेऊन रिझर्व्ह बँकेने विविध देशांच्या अधिशेष हस्तांतरणाची नोंद केली आहे.
  2. भारतीय रिझर्व्ह बँकेने वित्तीय वर्ष 2021साठी सरकारकडे 99,122 कोटी रुपयांची अतिरिक्त रक्कम हस्तांतरित केली, जी 2019-20 च्या तुलनेत 73 टक्क्यांनी जास्त आहे.
  3. अधिशेष हस्तांतरणामुळे मुक्त आणि स्वतंत्र आर्थिक वर्चस्व हे आरबीआयचे प्रमुख वैशिष्ट्य बनले आहे.
  4. भारत जगातील पाचवा सर्वाधिक रिझर्व्ह असलेला देशआहे, अमेरिकी कोषागार सिक्युरिटीज्‌ असलेला 12वा सर्वात मोठा परदेशी देश, तर सोन्याचा साठा असलेला जगातील दहावा देश असल्याचे आरबीआयने नोंदविले आहे.
  5. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, वित्तीय वर्ष 2022 साठीच्या प्रस्तावित आयातीच्या बाबतीत सध्याच्या साठ्यावर 15 महिन्यांपेक्षा कमी संरक्षण मिळू शकेल, जे इतर सर्वाधिक साठा असलेल्या देशांच्या तुलनेत कमी आहे.

उदा.

1) स्वित्झर्लंड – 39 महिने

2) जपान – 22 महिने

3) रशिया – 20 महिने

4) चीन – 16 महिने

  • भारताच्या साठ्यांचा निव्वळ आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या सहअस्तित्वाचा उल्लेख अहवालात केला आहे; ज्याचा स्तर जीडीपीच्या -12.9 टक्के आहे.
  • मे 2020 तुलनेत मे 2021 मध्ये प्राप्त 1,02,709 कोटी रुपये जीएसटी 65% ने जास्त आहे.
  • यंदाच्या इकॉनॉमिक आऊटलूक तसेच आर्थिक सहकार आणि विकास संस्था (ओईसीडी) यांनी 2021 मध्ये 5.8 टक्क्यांपर्यंत जागतिक वाढीचा अंदाज वर्तविला आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now