शस्त्रसंधी करारांचे कटाक्षाने पालन करण्याबाबत भारत – पाकचे एकमत

शस्त्रसंधी करारांचे कटाक्षाने पालन करण्याबाबत भारत – पाकचे एकमत

  • प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि जम्मू-काश्मीरमधील इतर भागात क्रॉस फायर उल्लंघनाच्या ५००० पेक्षा जास्त घटना तसेच यात २०२० मध्ये ४६ प्राणघातक मृत्यू यासाठी हा करार झाला आहे.
  • भारत आणि पाकिस्तान या दोन देशांत शस्त्रसंधीशी संबंधित सर्व जुन्या करारांचे कटाक्षाने पालन करण्यावर एकमत झाले.
  • भारतीय लष्कराचे सैन्य मोहीम महासंचालक लेफ्‍टनंट जनरल परमजित सिंग आणि पाकिस्तानी अधिकाऱ्यांत झालेल्या बैठकीत पुढील बाबतीत सहमती

अ) हॉटलाइनद्वारे वारंवार चर्चा करणे

ब) युद्धविराम, शस्त्रसंधी, उल्लंघनावर वाटाघाटीद्वारे तोडगा

क) गैरसमज दूर करण्यासाठी नियमित ध्वजबैठक घ्यावी.

  • दोन्ही देशांनी हा निर्णय २४-२५ फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून लागू करण्याची घोषणा केली.

युद्धसंधी करार, २००३

  • मूळचा युद्धबंदी करार कारगिल युद्धाच्या चार वर्षांनंतर नोव्हेंबर २००३ मध्ये झाला होता.
  • २००६ पर्यंत या करारामुळे नियंत्रण रेषेत शांतता निर्माण झाली होती.
  • मात्र २००६ नंतर या कराराचे उल्लंघन करणाऱ्या कृतीत वाढ

या कराराचे महत्त्व

  • काश्मिरमधील सुरक्षा परिस्थिती सुधारण्यास हातभार लागेल.
  • युद्धसंधी कराराचे उल्लंघन घुसखोर अतिरेक्यांना संरक्षण देण्याच्या उद्देशाने होते.
  • आता हा करार पुन्हा लागू झाल्यामुळे घुसखोरीचे प्रयत्न कमी होऊ शकतात.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now