शशिकला जवळकर
जन्म: ८ जानेवारी १९३३ (सोलापूर)
निधन: ४ एप्रिल २०२१
- सत्तरचे दशक अभिनयाने गाजवणार्या मराठी अभिनेत्री व खलनायिका
- वयाच्या पाचव्या वर्षापासूनच नृत्य व गाण्याचे धडे गिरवण्याची सुरुवात
- वडिलांचे उद्योगात नुकसान झाल्यामुळे कुटुंब मुंबईत स्थायिक झाले
- त्यावेळेच्या उत्कृष्ट गायिका अभिनेत्री नुर जहा यांना भेटून ‘झिनन’ या चित्रपटातून अभियानास सुरुवात केली
- व्ही. शांताराम यांनी ‘तीन बत्ती चार रास्ता’मध्ये (१९५३) बहुभाषिक भावजयींपैकी मराठी भावजयची भूमिका केली.
- १९५३ नंतर त्यांनी खलनायिकेच्या भूमिका साकारल्या आणि गाजवल्या
- २००५ पर्यंत त्यांनी शंभराहून अधिक चित्रपटात काम केले
चित्रपट:
अ) हिंदी: नॊ दो ग्यारह, अनपढ, कभी खुशी कभी गम, कानून, सरगम, चोरी चोरी, जंगली, रॉकी, घर घर की कहानी, हरियाली और रास्ता, बादशहा.
ब) मराठी: जागा भाड्याने देणे आहे, महानंदा, पठ्ठे बापूराव, लेक चालली सासरला, चाळीतील शेजारी, धाकटी सून.
क) मालिका: जीना इसी का नाम है, अपनापन, दील देके देखो, सोनपरी.
ड) पुरस्कार:
अ) आरती आणि गुमराह या चित्रपटांतील खलनायिकेच्या भूमिकांसाठी फिल्मफेअर
ब) २००७ – पद्मश्री
क) २०१४ – पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाकडून जीवनगौरव पुरस्कार
ड) २०१५ – राज कपूर कारकीर्द गौरव पुरस्कार (महाराष्ट्र शासन)
इ) व्ही. शांताराम लाइफ टाइम अचिव्हमेंट अवार्ड
समाजसेवा:
१९८० च्या दशकात मदर तेरेसांसोबत नऊ वर्षे मिशनरीज ऑफ चॅरिटीजमध्ये कुष्ठरोग्यांची सेवा, फरश्या पुसणे इत्यादी कामे केली

१९८० च्या दशकात मदर तेरेसांसोबत नऊ वर्षे मिशनरीज ऑफ चॅरिटीजमध्ये कुष्ठरोग्यांची सेवा, फरश्या पुसणे इत्यादी कामे केली