‘लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट’; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालीवर राहिल बारीक नजर

‘लेपर्ड कॉलर प्रोजेक्ट’; आता बिबट्यांच्या प्रत्येक हालचालीवर राहिल बारीक नजर

  • मुंबईच्या आसपास असणाऱ्या बिबट्यांचे विश्व उलघडणार आहे.
  • बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बिबट्यांचा नेमका प्रवास कसा होतो, काय करतो, कुठे जातो या बद्दलची सगळी माहिती रेडिओ कॉलरच्या माध्यमातून जाणून घेता येणार आहे.
  • मुंबईमध्ये अशा प्रकारचा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे.
  • उद्यानातील रेडिओ कॉलर लावलेल्या बिबट्या मादीचे नाव ‘सावित्री’ आहे.
  • बिबट्यांचा अधिवास, त्याच्या भक्ष्यासाठीच्या हालचाली, त्यासाठीचा प्रवास इत्यादी बाबी रेडिओ कॉलरच्या माध्यमातून जाणून घेणे सोपे होणार आहे.
  • याला ‘लेपर्ड कॉलर’ प्रकल्पही म्हटले जाते.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये

  • बिबट्या व मानवातील परस्परक्रियांचा अभ्यास
  • बिबटे घोडबंदर कसे ओलांडतात.
  • मानव व बिबट्यातील संघर्ष कमी करण्यासाठी काय उपाययोजना करता येतील
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय उद्यानांपैकी एक आहे.
  • महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय उद्यान
राष्ट्रीय उद्यान जिल्हा क्षेत्रफळ (चौ. कि.मी.) घोषणा (निर्मिती)
१) ताडोबा अंधारी चंद्रपूर ११६.५५ १९५५
२) पेंच (पंडित जवाहरलाल नेहरू उद्यान) नागपूर २५७.८६ १९७५
३) नवेगाव बांध गोंदिया १३३.८८ १९७५
४) संजय गांधी मुंबई उपनगर (बोरिवली) ८६.९६ १९८३
५) गूगामल मेळघाट (अमरावती) ३६१.२८ १९८७
६) चांदोली शिराळा (सांगली) ३१७.६७ २००४
  • सर्वात लहान उद्यान (महाराष्ट्रातील) – संजय गांधी
  • सर्वात मोठे उद्यान (महाराष्ट्रातील) – गूगामल

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now