रिझर्व्ह बँकेचे व्याजदर स्थिरच

रिझर्व्ह बँकेचे व्याजदर स्थिरच – 

  • अपेक्षेप्रमाणे स्थिर व्याजदराचा निर्णय घेणाऱ्या रिझर्व्ह बँकेचा व्याजदर स्थिर असला तरीही देशाच्या विकासदराबाबतचा अंदाज मात्र उंचावला आहे.
  • मात्र पतधोरणाच्या निमित्ताने देशासमोर महागाईचे आव्हान कायम असल्याचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्‍तिकांत दास यांनी सांगितले.
  • चालू वित्त वर्ष 2020-21 साठी यापूर्वी उणे 9.5 टक्के सकल राष्ट्रीय उत्पादन दर जाहीर करणाऱ्या रिझर्व्ह बँकेने आता हा अंदाज काहीसा सुधारून उणे 7.5 टक्क्यांचा बांधला आहे.
  • विद्यमान वित्त वर्षाच्या शेवटच्या दोन्ही तिमाहीत विकासदर शून्याच्या आसपासच राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
  • यानुसार ऑक्‍टोबर ते डिसेंबर 2020 मध्ये तो 0.1 टक्के, जानेवारी ते मार्च 2021 मध्ये तो 0.7 टक्के असेल.
  • चालू आर्थिक वर्षाचा पहिल्याच तिमाहीत विकास दर उणे 23.9 टक्क्यांपर्यंत रोडावला तर दुसऱ्या तिमाहीत तो उणे 7.5 टक्के नोंदला गेला.
  • व्याजदर किमान सलग 3 दिवस चालणाऱ्या रिझर्व्ह बँकेच्या  सहा सदस्यीय पतधोरण समितीने सलग तिसऱ्यांदा प्रमुख रेपो दर 4 टक्के असा किमान पातळीवर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला.
  • चालू वर्षात आत्तापर्यंत 1.11 टक्के दरकपात झाली आहे.
  • यापूर्वीची दरकपात 22 मे रोजी झाली.

रिझर्व्ह बँक उवाच –

  1. संपर्करहित कार्ड व्यवहार मर्यादा 5000 रुपयांपर्यंत
  2. अविरत आरटीजीएस सेवेला येत्या काही दिवसांतच सुरुवात.
  3. मोठे उद्योग, वित्त संस्थांच्या बँक परवान्याबाबत सकारात्मक
  4. तंत्रस्नेही रक्कम देय सुरक्षित नियंत्रण निर्देश जारी करणार.

वाढत्या महागाईचे आव्हान कायम – 

  • प्रामुख्याने अन्नधान्याच्या वाढत्या किमतीमुळे किरकोळ महागाईचा दर 2020-21 मध्ये 6 टक्क्यांच्या आसपास असण्याचा अंदाज व्यक्‍त करण्यात आला आहे.
  • मध्यवर्ती बँकेच्या सहनशील अशा 4 टक्क्यांपुढे असणारा महागाई दर दुसऱ्या तिमाहीत 6.8 टक्के, तर तिसऱ्या तिमाहीत 5.8 टक्के असेल.
  • सप्टेंबर 2020 मध्ये संपलेल्या पहिल्या अर्धवर्षात तो 5.2 ते 4.6 टक्के असेल असे नमूद करण्यात आले.

रेपो दर

  1. RBI इतर बँकांना (बँकांकडून शासकीय प्रतिभूती खरेदी करून किंवा त्यांचा पुनर्वटाव करून) आपत्कालीन कर्ज देते. या कर्जावर रिझर्व्ह बँक जे व्याज आकारते त्या व्याजाला रेपो दर असे म्हणतात.
  2. 2 ते 56 दिवसांसाठी ही रेपो कर्जे दिली जातात आणि 5 कोटींच्या पटीमध्ये दिली जातात.
  3. बाजारामध्ये आपत्कालीन तरलता निर्माण करणे हे रेपो दराचे उद्दिष्ट आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now