राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन

राष्ट्रीय संशोधन फाउंडेशन

  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भारतातील संशोधन परिसंस्थेला बळकटी देण्यासाठी राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (NRF) स्थापण्याचा प्रस्ताव दिला आहे.
  • NRF स्थापनेसाठीचा प्रस्तावित खर्च पाच वर्षांसाठी ५०००० कोटी रुपये इतका आहे.

उद्दिष्ट :

१) संशोधन क्षमता प्राथमिक टप्प्यात असलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये संशोधन सुलभ करणे.

२) एकच्छत्री संस्था म्हणून कार्य करेल तसेच संशोधन आणि विकास व शिक्षण आणि उद्योग यातील दुवे सुधारण्यास मदत करेल.

३) विज्ञान, तंत्रज्ञान, सामाजिक विज्ञान आणि कला या चार प्रमुख विषयांतील संशोधन प्रकल्पांना निधी पुरवेल.

४) राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मध्ये NRFच्या स्थापनेची योजना परिकल्पित आहे.

राष्ट्रीय संशोधन प्रतिष्ठान (National Research Foundation – NRF) :

१) संबंधित मंत्रालये, विभाग आणि इतर सरकारी/गैर-सरकारी संस्थांच्या सहकार्याने उच्च-प्रभाव, बहु-तपासनीस, बहु-संस्था, आंतरशाखीय किंवा बहु-राष्ट्रीय प्रकल्पांना निधी व समर्थन देईल.

२) भारतात संशोधनासाठी वाटप करण्यात आलेला निधी २००८ मध्ये जीडीपीच्या ०.८४ टक्क्यांवरून २०१४ मध्ये ०.६९ टक्के झाला आहे.

प्रादेशिक भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न :

  • राष्ट्रीय शिक्षण धोरण, २०२० मधील मुख्य अजेंडा म्हणजे शिक्षणातील प्रादेशिक भाषांचा प्रचार.

१) NEET, JEE (Mains) यासारख्या परीक्षांसाठी प्रादेशिक भाषांची संख्या १३ पर्यंत वाढविण्यात आली आहे.

२) २०११-१२ या शैक्षणिक वर्षापासून एआयसीटीई (अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद)ने तांत्रिक शिक्षणासाठी ८ प्रादेशिक भाषांना मान्यता दिली आहे.

३) एआयसीटीई ट्रान्स्लेशन ऑटोमेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्स टूल : इंग्रजी भाषेतील ऑनलाईन अभ्यासक्रम ११ प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादित करण्यासाठी.

  • ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्‌स, गेमिंग आणि कॉमिक्ससाठी नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) :

१) केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी याची घोषणा केली असून आयआयटी बॉम्बेच्या सहकार्याने स्थापना केली जाईल.

२) मीडिया आणि मनोरंजन हे भारतातील सर्वात वेगाने वाढणारे क्षेत्र असून २०२२ पर्यंत त्याचे मूल्य ३४.८ अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा.

३) सीओई भारतीय तसेच जागतिक उद्योगाच्या गरजा पूर्ण करण्यास मदत करेल.

४) चित्रपट उद्योगात विदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (NFDC) दरवर्षी गोव्यात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘चित्रपट बझार’ आयोजित करते. 

५) भारताचे १५ देशांसोबत दृक्श्राव्य सहनिर्मिती करारदेखील आहेत.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now