राष्ट्रीय आतंकवादविरोधी दिन (राजीव गांधी पुण्यतिथी)

राष्ट्रीय आतंकवादविरोधी दिन (राजीव गांधी पुण्यतिथी)

  • भारतात दरवर्षी २१ मे हा दिवस आतंकवादविरोधी दिवस म्हणून पाळला जातो. या दिवसाचे औचित्य साधून तरुणांसह समाजातील सामान्यांना सामान्यांना आतंकवादाच्या विरुद्ध उभे राहण्यासाठी शपथ दिली जाते.
  • प्रमुख्याने तरुणवर्गाला आतंकवाद, हिंसा यापासून दूर ठेवत समाजात शांती आणि मानवतेचा संदेश देण्यासाठी जागरूक केले जाते.
  • भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची २१ मे १९९१ रोजी हत्या झाल्याने हा दिवस आतंकवाद विरोधी दिन म्हणून घोषित करण्यात आला.
  • २१ मे १९९१ रोजी लोकसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान राजीव गांधी तामिळनाडूमध्ये श्रीपेरंबदूर येथे सभेसाठी गेले होते. तेथे श्रीलंकेतील लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ ईलम (LTTE) या दहशतवादी संघटनेची महिला सदस्य धनु हिने राजीव गांधींच्या जवळ जाऊन आपल्या कमरेला बांधलेला मानवी बॉम्ब उडवून दिला.
  • यामध्ये तिचा, राजीव गांधींचा आणि इतर २५ व्यक्तींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे भारताने लिट्टे या संघटनेला दहशतवादी घोषित केले. याचे अनुकरण करत इतर ३२ देशांनी लिट्टेला दहशतवादी घोषित केले
  • आई इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये राजीव गांधी पंतप्रधान बनले. इ. स. १९८८ मध्ये श्रीलंकन तामिळी दंगलीमध्ये त्यांनी श्रीलंकेत शांती सेना पाठवण्याचा निर्णय घेतला. यात त्यांना फारसे यश आले नाही; परंतु याचा परिणाम लिट्टेसोबत संघर्षामध्ये झाला.
  • श्रीलंकेतील तमिळ संघर्ष तेथील तमिळ भाषक व्यक्तींनी वेगळा देश मागण्यासाठी केलेला उठाव होता.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now