महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार २०२०चा न. म. जोशी तर २०२१चा डॉ. अनिल अवचट यांना जाहीर

महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार २०२०चा न. म. जोशी तर २०२१चा डॉ. अनिल अवचट यांना जाहीर

  • महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा “महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार” साहित्यिक डॉ. न. म. जोशी यांना (२०२०चा) आणि डॉ. अनिल अवचट (२०२१) यांना जाहीर झाला आहे.
  • तसेच वाङ्मयीन चळवळीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल कोल्हापूर येथील सुनिलकुमार लवटे (२०२०) आणि इंदूर येथील मोहन रेडगावकर (२०२१) यांना “डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार” जाहीर करण्यात आला आहे.
  • ११५ ह्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
  • डॉ. न. म. जोशी आणि डॉ. अनिल अवचट यांना त्यांनी लेखनातून केलेल्या साहित्य सेवेबद्दल ‘मसाप’ जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • वाचन आणि साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल सुनिलकुमार लवटे आणि मोहन रेडगांवकरांना डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
  • डॉ. न. म. जोशी यांना अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित केले आहे.
  • बालसाहित्यामध्ये भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीला या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाते.

महाराष्ट्र साहित्य परिषद (मसाप)

  • स्थापना : १९०६
  • एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली.
  • चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात भरलेल्या संमेलनात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली.
  • तेव्हापासून मसाप मराठी भाषा साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now