भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

भितरकनिका राष्ट्रीय उद्यान

  • भितरकनिका राष्ट्रीय उद्यान हे भारतातील ओडिशा राज्यातील केंद्रपाडा जिल्ह्यात स्थित असून उद्यानाच्या बाजूने भितरकनिका अभयारण्य वसलेले आहे.
  • 16 सप्टेंबर 1998 रोजी हे उद्यान राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले तर ऑगस्ट 2002 मध्ये युनेस्कोने या उद्यानाचा रामसार यादीत समावेश केला आहे.
  • उद्यानाच्या पूर्वेला गहिरमाथा सागरकिनारा आणि सागरी अभयारण्य आहे.
  • या राष्ट्रीय उद्यानात ब्राह्मणी, वैतरणी, धामरा, पाठसाला या नद्यांमधून पाणी येते. 
  • भितरकणिका येथील जैवविविधतेसाठी आणि खारफुटीच्या वनस्पतींसाठी जागतिक पातळीवर प्रसिद्ध आहे.

वनस्पती सृष्टी

  • भितरकणिका हे खारफुटीचे जंगल असल्याने तेथे सुंदरी (थेस्पिया) सारख्या विविध प्रकारच्या खारफुटी वनस्पतींच्या प्रजाती आहेत.
  • भारतातील ही दुसऱ्या क्रमांकावर असलेली सर्वात मोठी खारफुटी परिसंस्था आहे.
  • येथील वन हे ‘हेंतल वन’ म्हणूनही ओळखले जाते.

प्राणी सृष्टी

  • भितरकणिका येथे लांडगा, तरस, कोल्हा, खोकड, रानमांजर, लाल तोंडी माकड, चितळ, सांबर असे विविध जातींचे सस्तन प्राणी आढळतात. 
  • त्याशिवाय खाऱ्या पाण्यातील मगर, पाण घोरपड, अजगर यांसह इतर अनेक साप हे सरीसृप वर्गातील प्राणी आढळतात.
  • भितरकणिका हे पक्ष्यांचे नंदनवन म्हणून ओळखले जाते.
  • धोका असलेल्या खाऱ्या पाण्यातील मगरी येथे सर्वात जास्त संख्येने आढळतात.
  • पांढऱ्या रंगाच्या मगरींचा आढळ अधिक प्रमाणात असल्याने उद्यानाला ‘White Crocodile Park’ असेही म्हटले जाते.

खास आकर्षण

  • जगातील सर्वात मोठ्या आकाराची खाऱ्या पाण्यातील मगर (लांबी जवळपास 23 फूट), पाण घोरपड, गहिरमाथा या सागर किनाऱ्यावर दिसणारे ऑलिव्ह रिडले हे समुद्र कासव अशा दुर्मिळ प्रजाती येथील सर्वात मोठे आणि खास आकर्षण आहे.
  • खंड्या या पक्ष्याच्या वेगवेगळ्या 8 जाती येथे आढळतात.

बातम्यांमध्ये का?

  • बंगालच्या उपसागरामध्ये उद्‌भवलेल्या ‘यास’ चक्रीवादळाचा तडाखा उद्यानाला बसल्यामुळे उद्यानातील हजारो झाडे उन्मळून पडली असून उद्यानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
  • चक्रीवादळामुळे येथील जैवविविधता धोक्यात आली असून असंख्य प्राण्यांचा यात मृत्यूदेखील झाला आहे.
  • चक्रीवादळाचा परिणाम मगरींच्या पुनरुत्पादनावर झाला आहे.
  • तसेच तेथील पर्यटन व्यवसायालाही चक्रीवादळामुळे मोठे नुकसान पोहोचले आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now