भारतातील सागरी मासेमारीत विक्रमी वाढ

भारतातील सागरी मासेमारीत विक्रमी वाढ 

  • केंद्रीय समुद्री मत्स्यव्यवसाय संशोधन संस्था (CMFRI) च्या भारतातील वार्षिक सागरी मत्स्योत्पादन २०१९ या अहवालाच्या अनुषंगाने २०१९ मध्ये २०१८ च्या तुलनेत भारतातील सागरी माशांचे उत्पादन २.१% ने वाढून ३.५.६६ दशलक्ष मेट्रिक टन पर्यंत वाढले आहे.
  • अहवालानुसार, माशांच्या वार्षिक उत्पादनात ७.७५ लाख टन उत्पादनासह तमिळनाडूने प्रथम स्थान मिळविले असून त्यानंतर गुजरात (७.४९ लाख टन), तर केरळ (५.४४ लाख टन) तिसर्‍या क्रमांकावर आहे. 
  • मागील वर्षी देशात मत्स्योत्पादनाच्या अंदाजित किंमतीचे प्रमाण २०१८ च्या तुलनेत १५.६% टक्क्यांनी वाढून ६०,८८१ कोटी रुपये होते. 
  • उल्लेखनीय म्हणजे, जागतिक आघाडीवर, सागरी माशांच्या उत्पादनात चीन आणि इंडोनेशियानंतर भारत तिसर्‍या क्रमांकावर आहे.
  • Fish Landing म्हणजे सागरात मासे पकडून ते जमिनीवर आणणे.
  • लाल दात असलेला ट्रिगरफिश, व्यावसायिकदृष्ट्या बिनमहत्त्वाचा मासा, सर्वात अधिक उत्पादित (२.७४७४ लाख टन) झाला. या माशाची देशांतर्गत बाजारपेठेत मागणी कमी असते आणि बहुतेकदा तो फीड मिलसाठी पकडला जातो. 
  • दुसर्‍या क्रमांकाच्या लँडिंगमध्ये रिबन फिश (२.१९ लाख टन), त्यानंतर पेनाईड कोळंबी (१.९५ लाख टन) आणि नॉन-पेनाइड कोळंबी (१.८० लाख टन) होती. 
  • २०१८ मध्ये प्रथम क्रमांकावर असलेल्या भारतीय मॅकरेल लँडिंगमध्ये २०१९ मध्ये ४३% घट झाली. 
  • फिश लँडिंगमधील राज्यांतील परिस्थिती : पश्चिम बंगाल (५५ टक्के), आंध्र प्रदेश (३४ टक्के), ओडिशा (१४.५ टक्के), कर्नाटक (११ टक्के) आणि तामिळनाडू (१०.४ टक्के) या राज्यांत लँडिंगमध्ये वाढ झाली आहे, तर महाराष्ट्र (३२ टक्के), गोवा (४४ टक्के) आणि केरळ (१५.४ टक्के) मध्ये समुद्री मासेमारीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. 
  • चक्रीवादळ प्रभाव : अहवालानुसार, भारत आणि त्याच्या आसपासच्या ८ चक्रीवादळांपैकी ६ चक्रीवादळे तीव्र ठरली. (एप्रिलमध्ये फणी, जूनमध्ये वायू, सप्टेंबरमध्ये हिका, ऑक्टोबरमध्ये क्यार, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये महा आणि बुलबुल) यामुळे देशातील पश्चिम किनारपट्टीवर मासेमारी दिवसांवर अधिक प्रतिकूल परिणाम झाला. 
  • सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या मत्स्य संसाधन मूल्यांकन विभागाने त्याच्या ऑनलाइन डेटा संकलन प्रणालीद्वारे सागरी माशांच्या वार्षिक उतारांचा अंदाज लावला आहे. संचालक – डॉ. ए. गोपालकृष्णन, मुख्यालय- कोची, केरळ

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now