भारतातील जंगलामध्ये लवकरच चित्त्यांचे आगमन

भारतातील जंगलामध्ये लवकरच चित्त्यांचे आगमन

  • भारतातून चित्ता पूर्णपणे नामशेष झाल्याचे अधिकृतरीत्या घोषित केल्यानंतर जवळजवळ सात दशकांनंतर आफ्रिकेतून चित्ता स्थानांतरित
  • मध्यप्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार आहे.
  • राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या बैठकीत हा आराखडा ठेवण्यात आला.
  • जगातील हा पहिला आंतरराष्ट्रीय चित्ता स्थानांतरण प्रकल्प आहे.
  • जगातील सर्वात वेगवान धावणाऱ्या प्राण्याला सरकारने नामशेष म्हणून घोषित केले होते.
  • २०१२ पासून भारतात चित्ता आणण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू होत्या. शेवटी ऑगस्ट २०१९मध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय व्याघ्रसंवर्धन प्राधिकरणाला मंजुरी दिली.
  • २०२०मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या सुकाणू समितीच्या उपसमितीने मध्यप्रदेशसह झारखंड आणि राजस्थानमध्येही चित्ता आणता येईल का याची चाचणी केली.
  • मध्यप्रदेशातील कुनो या राष्ट्रीय उद्यानात आफ्रिकन चित्ता आणण्यात येणार आहे.
  • ७५० चौरस किलोमीटर्समध्ये हे उद्यान आहे.
  • पहिल्या टप्प्यात १२ ते १५ चित्ते आणण्यात येणार आहेत. व पुढच्या पाच वर्षांत ४० ते ५० चित्ते पुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
  • नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतील चित्ता येत्या चार ते सहा महिन्यांत भारतात पोहोचणार आहेत.
  • १९५२ मध्ये चित्ता देशातून नामशेष झाल्याचे घोषित करण्यात आले होते.

भारतातील व्याघ्र प्रकल्प

क्र. राज्य व्याघ्र प्रकल्पाचे नाव
१. आंध्रप्रदेश नागार्जुनसागर, श्रीशैलम व्याघ्र प्रकल्प
२. अरुणाचल प्रदेश कमलांग व्याघ्र प्रकल्प नामदाफा
३. आसाम कांझीरंगा, ओरंग, नमेरी, मानस व्याघ्र प्रकल्प
४. बिहार वाल्मिकी
५. झारखंड पलमारु व्याघ्र प्रकल्प
६. कर्नाटक बंदीपूर, बंध्रा, नागरहोले व्याघ्र प्रकल्प
७. केरळ पेरियार व्याघ्र प्रकल्प
८. मध्यप्रदेश बांधवगढ, पेंच, कान्हा, पन्ना व्याघ्र प्रकल्प
९. महाराष्ट्र बोर, नागझीरा, मेळघाट, Tadoba
१०. ओदिशा शिमलीपल
११. राजस्थान रणथंबोर
१२. तमिळनाडू मदुमलाई, सत्यमंगलम
१३. उत्तरप्रदेश दुधवा, पिलीभीत
१४. उत्तराखंड जीम कॉर्बेट
१५. पश्चिमबंगाल सुंदरबन

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now