प्रधानमंत्री मित्र योजना

प्रधानमंत्री मित्र योजना

  • सुरुवात – ६ ऑक्टोबर २०२१
  • ही योजना प्रधानमंत्री मेगा टेक्सटाइल इंटिग्रेटेड टेक्सटाइल आणि परिधान योजना म्हणूनही ओळखली जाते.
  • या योजनेअंतर्गत देशभरात ७ एकात्मिक वस्त्रोद्योग उद्याने बांधली जातील जेणेकरून सूत, विणकाम, प्रक्रिया, रंगाई आणि छपाईपासून ते कपड्यांचे उत्पादन एकाच ठिकाणी केले जाईल. पूर्वी ही सर्व कामे देशातील विविध राज्यांमध्ये केली जात होती. यामुळे भरपूर खर्च येत होता. या योजनेमुळे हा खर्च कमी होईल.
  • या योजनेच्या माध्यमातून कापड आणि उत्पादन क्षेत्रात मोठी क्रांती येईल.
  • ही योजना ५ एफ मॉडेलपासून प्रेरित झालेली आहे. जी फार्म ते फायबर ते फॅक्टरी ते फॅशन ते फॉरेन अशी आहे.
  • या योजनेद्वारे टेक्सटाईल पार्कमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील. जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आकर्षित करेल आणि थेट परकीय गुंतवणूक आणि या क्षेत्रातील स्थानिक गुंतवणुकीला चालना देईल.
  •  या योजनेमुळे २१ लाख रोजगार निर्माण होतील. ज्यात ७ लाख प्रत्यक्ष आणि १४ लाख अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होतील.
  • ही योजना भारतीय कंपन्यांना जागतिक कंपन्या म्हणून उदयास येण्यास मदत करेल.
  • ह्या योजनेसाठी सरकारकडून ४४४५ कोटी रुपये खर्च केले जातील.
  • ग्रीन फील्ड पार्क विकसित करण्यासाठी ५०० कोटी खर्च केले जातील.
  • ब्राऊनफिल्ड पार्क विकसित करण्यासाठी २०० कोटी खर्च केले जातील.
  • या व्यतिरिक्त, सर्व उत्पादन युनिटला स्पर्धात्मक प्रोत्साहन देण्यासाठी ३०० कोटींची मदत दिली जाईल.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now