पीएनएस – तुघरील

पीएनएस – तुघरील

  • चीनने अतिशय प्रगत युद्धनौका पीएनएस – तुघरील ही पाकिस्तानला दिली आहे.
  • ही युद्धनौका चायना स्टेट शिपबिल्डिंग कॉर्पोरेशन लि. या कंपनीने तयार केली असून शांघाय समारंभात ती पाकिस्तानच्या नौदलास सुपूर्द करून कार्यान्वित करण्यात आली.

पीएनएस – तुघरिलची वैशिष्ट्ये

  • पीएनएस तुघरिल ही युद्धनौका ०५४ ए. पी फ्रिगेट या प्रकारची आहे.
  • या युद्धनौकेत जमिनीवरून जमिनीवर, जमिनीवरून हवेत, पाण्यातून वरच्या भागात मारा करण्याची क्षमता आहे.
  • या युद्धनौकेवर अतिप्रगत युद्धसामग्री असून इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्राची व्यवस्था आहे.
  • एकाच वेळी जास्त नौदल युद्धतंत्र मोहिमा राबविण्याची क्षमता या युद्धनौकेत आहे.
  • चीनने निर्यात केलेली आतापर्यंतची सर्वात मोठी व प्रगत युद्धनौका

चीन – पाकिस्तान संबंध

  • चीन हा पाकिस्तानचा मुख्य शस्त्रपुरवठादार आहे.
  • जेएफ – १७ थंडर फायटर जेटच्या निर्मितीसाठी चीनने पाकच्या हवाईदलाला मदत केली आहे.
  • पाण्यातील अत्यल्प ध्वनीकंपनामुळे अदमास घेणे कठिण असलेल्या ‘०३९ बी युआन’ या पाणबुडीमुळे पाकचे समुद्री वर्चस्व वाढेल.

हिंदी महासागरातील चीनचा वाढता हस्तक्षेप

१) चीनने हिंदी महासागरातील जिबुती येथे पहिले सैन्यतळ उभारले आहे.

२) पाकिस्तानचे अरबी समुद्रातील ग्वादार बंदर ताब्यात घेऊन चीनमधील शिनजियांग प्रांताला जोडले आहे, चीन – पाकिस्तान आर्थिक मार्गिका  प्रकल्पात (CPEC) त्यांचा समावेश करण्यात आला आहे.

३) चीनने श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरही ९९ वर्षांच्या भाडेतत्त्वावर हस्तगत केले आहे.

४) चीनने पाकशी केलेल्या सात अब्ज डॉलर्सच्या शस्त्रकरारामुळे भारताला अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now