परकीय चलनसाठ्यात भारताचा चौथा क्रमांक

परकीय चलनसाठ्यात भारताचा चौथा क्रमांक

  • परकीय चलनसाठ्यात भारत जगात चीन, जपान आणि स्वित्झर्लंडनंतर चौथ्या क्रमांकावर आहे.

 

पार्श्वभूमी :

 

  • रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार १६ जुलै २०२१ रोजी भारताचा परकीय चलन साठा ८३५ दशलक्ष डॉलर्सने वाढून ६१२.७३ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.

 

सर्वाधिक परकीय चलन साठा असलेले देश :

क्र. देश परकीय चलनसाठा (अब्ज डॉलर्स)
चीन ३३४९
जपान १३७६
स्वित्झर्लंड १०७४
भारत ६१२.७३
रशिया ५९७.४०

 

परकीय चलनसाठ्यात कशाचा समावेश होतो?

 

१) मध्यवर्ती बँकेकडे असलेले परकीय चलन (FCA)

२) मध्यवर्ती बँकेकडील सोने

३) स्पेशल ड्रॉईंग राइट्‌स्‌ (SDL) : सदस्य देशांचा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) एकूण भांडवलातील वाटा.

४) रिझर्व्ह ट्रान्च पोझिशन (RTP) : सदस्य देशांचा IMF मधील असलेल्या भांडवलापैकी परकीय चलनाच्या स्वरूपातील वाटा.

 

भारताच्या परकीय चलनसाठ्यात वाढ होण्याची कारणे :

 

१) रिझर्व्ह बँकेकडील परकीय चलन ४६३ दशलक्ष डॉलर्सने वाढून ५६८.७४ अब्ज डॉलर्स झाले आहे.

२) सोने साठ्यात ३७७ दशलक्ष डॉलर्स वाढ होऊन ३७.३३ अब्ज डॉलर्स झाला आहे.

 

परकीय चलनसाठ्याचे महत्त्व :

 

१) परकीय व्यवहारतोलातील महत्त्वाचा घटक असून यामुळे परकीय व्यापारात तरलता राहते.

२) ज्या देशाचा परकीय चलनसाठा जास्त, त्या देशाची अर्थव्यवस्था सक्षम असते.

 

परकीय चलनसाठ्यात वाढ करण्यासाठी सरकारचे प्रयत्न :

 

१) आत्मनिर्भर भारत

२) शुल्क सूट योजना (Duty Exemption Scheme)

३) निर्यात मालावर शुल्क किंवा कर माफी (Remission of Duty or Taxes on Export Product – RoDTEP)

४) निर्विक (निर्यात ऋण विकास योजना)

५) सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित करणाऱ्या सर्वोच्च देशांपैकी भारत एक आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now