ड्राय स्वॅब तंत्रज्ञान RTPCR चाचणीला पर्याय यामुळे वेळ आणि खर्च निम्म्यावर येणार

ड्राय स्वॅब तंत्रज्ञान RTPCR चाचणीला पर्याय

यामुळे वेळ आणि खर्च निम्म्यावर येणार

  • RTPCR चाचणीमुळे कोरोना झाला की नाही याचे निदान होते. या चाचणीचे निष्कर्ष समजायला किमान 24 तास लागतात. याचा खर्चही पाचशे ते दीड हजारपर्यंत येतो. मात्र हैदराबाद येथील शास्त्रज्ञांनी हा वेळ आणि खर्च अर्ध्यावर आणणारे ड्राय स्वॅब तंत्रज्ञान विकसित केले आहे.
  • हैदराबाद येथील संस्थेने (CCMB) नवे तंत्रज्ञान विकसित केले आहे. ही संस्था वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेअंतर्गत काम करते.
  • RTPCR मध्ये नाकातील किंवा घशातील स्वॅब घेऊन रासायनिक द्रव्य असलेल्या ट्यूबमध्ये टाकतात. नंतर तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. त्यावर वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात. यामध्ये RNA वेगळा (Extraction) करण्याची प्रक्रिया असते.
  • यामध्ये RNA कशाचा आहे हे समजते आणि कोरोना संसर्ग झाला आहे की नाही याचे निदान होते. त्यासाठी सुसज्ज प्रयोगशाळा असेल तर चार तासांमध्ये चाचणी होते.
  • परंतु नवीन तंत्रज्ञानामध्ये RNA Extraction ही महत्त्वाची प्रक्रिया न करताही ‘ड्राय स्वॅब’द्वारे संबंधित व्यक्ती कोरोना संक्रमित आहे की नाही, याचा निष्कर्ष काढता येणार आहे. 
  • CCMB या संस्थेत अशा प्रकारे 60 हजार चाचण्या करण्यात आल्या असून, त्यात चाचणीचा अचूक निष्कर्ष मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
  • या तंत्रज्ञानाला ICMRने मान्यता दिली असल्याची माहिती सेंटर फॉर सेक्युलर ॲण्ड मॉलेक्यूलर बायोलॉजी (CCMB) तील प्रवक्ता डॉ. सोमदत्ता कारक यांनी दिली.
  • या चाचण्यांसाठी नवे किट तयार करण्याची आणि मनुष्यबळाला वेगळे प्रशिक्षण देण्याचीही गरज नसल्याचे CSIR चे संचालक डॉ. शेखर मांडे यांनी सांगितले.
  • ‘ड्राय स्वॅब’ तंत्रज्ञानामुळे RTPCR चाचणीच्या विश्लेषणाचे प्रमाण तीन पटीने वाढेल. त्याची किंमत त्यावर येऊ शकते. सध्या स्वॅब हा रासायनिक द्रवात टाकून त्याचे वहन करावे लागते. नव्या तंत्रज्ञानामुळे स्वॅबची हाताळणी सहज होईल, त्यासाठी खूप सुरक्षा उपायांची गरज नाही. वाहतुकीदरम्यान द्रव दूषित होण्याचा धोकाही टळेल. येत्या काही  दिवसांत हे तंत्रज्ञान वापरासाठी उपलब्ध होईल, अशी माहिती CCMB चे संचालक डॉ. राकेश मिश्रा यांनी दिली.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now