जागतिक स्थलांतरित पक्षी दिन

जागतिक स्थलांतरित पक्षी दिन

  • मागील काही दशकांपासून स्थलांतरित पक्ष्यांच्या अधिवासावर होत असलेले अतिक्रमण प्रदूषण आणि जंगलतोड अशा मानवी कृतीमुळे त्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहे. त्यामुळे यासंदर्भात मोठ्या प्रमाणात जनजागृती होणे आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी मे महिन्यात दुसर्‍या शनिवारी जागतिक स्थलांतरित पक्षी दिन साजरा करण्यात येतो.
  • यावर्षी हा दिवस ८ मे रोजी साजरा होत आहे.
  • ‘द कन्व्हेन्शन मायग्रेटरी स्पिशीज्’, ‘आफ्रिकन युरेशियन वॉटर बोर्ड अ‍ॅग्रीमेंट’ या दिवसासाठी पुढाकार घेणार्‍या संस्था आहेत.
  • पहिला जागतिक स्थलांतरित पक्षी दिन २००६ साली पाळण्यात आला.
  • स्थलांतरित प्रजातींच्या संरक्षणार्थ संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाच्या (UNEP) मार्गदर्शनाखाली १९८३ साली ‘द कन्व्हेन्शन ऑन मायग्रेटरी स्पिशीज् (CMS)’ यासंदर्भात वैश्विक करारनामा मंजूर करण्यात आला. CMS ही एकमेव जागतिक आणि अंतर सरकारी संस्था आहे, जी पूर्णपणे जगभरातल्या सर्व स्थलांतर करणार्‍या पाण्यात आढळून येणार्‍या आणि पशुपक्षी यांच्या प्रजातींचे संरक्षण आणि व्यवस्थापन करण्याची जबाबदारी सांभाळते.
  • यावर्षीचा जागतिक स्थलांतरित दिन ‘Sing, Fly, Soar – Like a bird!' या संकल्पनेखाली पाळण्यात आला.

बोन करार / स्थलांतरित वन्य प्रजातींच्या संवर्धनासाठी करार ः

  • स्थलांतर करणार्‍या वन्य प्रजातींचे व त्यांच्या अधिवासांचे संरक्षण, संवर्धन आणि व्यवस्थापन करण्याविषयीचा हा करार बोन करार म्हणून ओळखला जातो.
  • ‘Convection of Migratory Species of Wild Animals’ म्हणजेच बोन करार.
  • स्वाक्षर्‍या ः ६ नोव्हेंबर १९७९ (बॉन जर्मनी) येथे.
  • करार अंमलात ः १ नोव्हेंबर १९८३
  • सदस्य ः १२९ देश
  • भारतामध्ये अंमलात १९८३

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now