जागतिक बँकेनुसार भारताच्या जीडीपीत ८.३ टक्के वाढ अपेक्षित

जागतिक बँकेनुसार भारताच्या जीडीपीत ८.३ टक्के वाढ अपेक्षित

  • दक्षिण आशियातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारताच्या अर्थव्यवस्थेत २०२१-२२ या वित्तीय वर्षात ८.३ टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे, असे जागतिक बँकेने म्हटले आहे.
  • दक्षिण आशिया आर्थिक केंद्र अहवालान्वये, या प्रदेशात २०२१ आणि २०२२ या वर्षासाठी ७.१ टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे.
  • अलिकडील आर्थिक घडामोडी आणि दक्षिण आशियासाठी आर्थिक दृष्टीकोनाचे सादरीकरण करणारा हा द्विवार्षिक आर्थिक अहवाल आहे.

अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

  • जीडीपी वाढ: देशांतर्गत मागणी आणि उत्पादन वाढीसाठी प्रॉडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (पीआयएल) सारख्या योजनांना चालना देण्यासाठी सार्वजनिक गुंतवणूकीत वाढीचा अंदाज ८.३ टक्के वर्तविला आहे.
  • महत्त्वपूर्ण बेस इफेक्ट (प्रभाव), देशांतर्गत मागणीचे मर्यादित नुकसान, निर्यात वाढ या कारणांमुळे २०२१-२२ च्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल-जून) भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात २०.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

आर्थिक पुनर्प्राप्ती

  • भारतातील विविध क्षेत्रातील आर्थिक पुनर्प्राप्ती असमान आहे.
  • २०२१ मध्ये उत्पादन आणि बांधकाम क्षेत्रात स्थिरावले असले तरीही अकुशल किंवा कमी कुशल व्यक्ती, स्वयंरोजगार करणारे, महिला तसेच लघु उद्योग मागे पडले आहेत.
  • कोविड-१९ विरुद्ध लसीकरणाची गती, कृषी आणि कामगार सुधारणांच्या यशस्वी अंमलबजावणीद्वारे भारताची आर्थिक स्थिती स्थिरावली आहे.
  • संबंधित जोखीम : पुनर्प्राप्तीच्या प्रमाणाशी संबंधित जोखीमांत पुढील बाबींचा समावेश होतो – आर्थिक क्षेत्राचा वाढता ताण, लसीकरणात मंदी, उच्च चलनवाढीमुळे आर्थिक धोरण समर्थनास अडथळा.

जागतिक बँक :

  • स्थापना : ३१ डिसेंबर १९४५ (१९४४ च्या ब्रेटनवुड परिषदेनुसार)
  • सदस्य देश – १८९
  • मुख्यालय – वॉशिंग्टन
  • अध्यक्ष – डेव्हिड मालपास

प्रकाशने

अ) वर्ल्ड डेव्हलपमेंट रिपोर्ट

ब) ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्टस्‌

क) मानवी भांडवल निर्देशांक

इतर :

  • नुकतेच आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने १२ ऑक्टोबर २०२१ रोजी जाहीर केलेल्या ग्लोबल इकॉनॉमिक आउटलुकनुसार भारताचा वृद्धीदर २०२१ मध्ये ९.५ टक्के आणि २०२२ मध्ये ८.५ टक्के वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

आयएमएफनुसार इतर देशांचा वृद्धिदर :

देश वृद्धीदर (२०२२)
चीन ५.६%
अमेरिका ५.२%
ब्रिटन ५%

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now