जागतिक तंबाखू निषेध दिन

जागतिक तंबाखू निषेध दिन

  • तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्यापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी जनजागृती म्हणून दरवर्षी ३१ मे हा दिवस जगभरात तंबाखूसेवन विरोधी दिन म्हणून पाळला जातो.
  • तंबाखू सेवनामुळे होणार्‍या हानीकारक दुष्परिणामांबद्दल लोकांना कळावे आणि लोकांनी हे व्यसन सोडावे म्हणून जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि त्यांनी चर्चेअंती १९८७ साली एक अंतिम ठराव संमत केला.
  • तेव्हापासून म्हणजेच १९८८ पासून दरवर्षी ३१ मे रोजी ‘नो टोबॅको डे’ पाळला जातो.
  • २०२१ सालची थीम ः "Commit to quit."

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम :

  • २००४ सालच्या भारतातील तंबाखू नियंत्रणाच्या अहवालानुसार भारतात प्रतिवर्षी सुमारे आठ ते नऊ लाख लोकांचा मृत्यू हा तंबाखूजन्य पदार्थ सेवनामुळे होणार्‍या आजारांमुळे होतो. यासाठी अकराव्या पंचवार्षिक योजने २००७-०८ साली आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयातर्फे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला.
  • याद्वारे सिगारेट व तंबाखूजन्य उत्पादने कायदा २००३ ची प्रभावी अंमलबजावणी केली जाते.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now