कोविड-१९ दरम्यान भारताचा जीडीपी ९% नी तर आशिया विकसनशील यांचा ०.७ टक्क्यांनी घटेल : एडीबी

कोविड-१९ दरम्यान भारताचा जीडीपी ९% नी तर आशिया विकसनशील यांचा ०.७ टक्क्यांनी घटेल : एडीबी

  • एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) च्या एशियन डेव्हलपमेंट आऊटलूक अपडेट २०२० च्या अनुषंगाने कोविड-१९ मध्ये मंदावलेल्या आर्थिक घडामोडींमुळे भारताचा जीडीपी आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ९% राहील.
  • दुसरीकडे गतिशील व व्यवसाय अ‍ॅक्टिव्हिटी अधिक व्यापकपणे सुरू झाल्यामुळे आर्थिक वर्ष २०२०-२०२२ मध्ये जीडीपीसह ८% वाढीचा अंदाज आहे.
  • स्थूल देशांतर्गत उत्पन्न (जीडीपी) म्हणजे देशाच्या भौगोलिक सीमेच्या आत उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा किंवा कमावलेले उत्पन्न. जीडीपीमुळे अर्थव्यवस्थेचे संख्यात्मक आकलन होते.
  • आर्थिक वर्ष २०२० मध्ये भारताची वित्तीय तूट लक्षणीय वाढेल कारण सरकारचा खर्च जास्त व उत्पन्न कमी होते.
  • विकसनशील आशियाचा जीडीपी २०२० मध्ये ०.१% च्या अंदाजापेक्षा ०.७% नी घसरण्याची शक्यता आहे. क्षेत्रीय जीडीपी ०.५% नी घसरण्याची शक्यता आहे.
  • ३१ मार्च २०२० रोजी एशियन डेव्हलपमेंट बँक या प्रादेशिक विकास बँकेने कमी उत्पन्न असलेल्या समाजातील महिलांना प्राथमिक कर्जदार किंवा सहकारी गृहनिर्माण वित्तपुरवठा करण्यासाठी परवडणार्‍या गृहनिर्माण कर्जप्रदाता आवास फानयान्सर्स लिमिटेड यांच्यासह ६० दशलक्ष डॉलर्स कर्जाच्या करारावर स्वाक्षरी  केली आहे.

एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) बद्दल :

  • मुख्यालय : मंडलयुअंग, फिलिपिन्स
  • सदस्यता : ६८ देश
  • अध्यक्ष : मसात्सुगु असकावा
  • एका विकसित प्रदेशाच्या गरजेनुसार संस्था स्थापन करण्याच्या कल्पनेने आशियाने १९६६ मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक (ADB) ची स्थापना केली.
  • आशिया आणि पॅसिफिकला गरीबीतून मुक्त करणे हे या बँकेचे उद्दिष्ट आहे. 
  • सदस्य राष्ट्रांमधील दारिद्य्र कमी करणे आणि लोकांचे जीवनमान सुधारणे हे या बँकेचे ध्येय आहे.
  • कार्य : ही एक बहुपक्षीय वित्तीय विकास संस्था म्हणून काम करते आणि कर्ज देते.
  • विकास प्रकल्पांना अनुदान व तांत्रिक सहाय्य देखील करते.
  • पर्यावरण संरक्षण, वित्तीय क्षेत्राचा विकास, प्रादेशिक सहकार्य, शैक्षणिक सुधारणा, पायाभूत सुविधा यांवर त्याचा मुख्य भर असतो.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now