कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी ‘पीएम केअर्स फंडा’चे २२०० कोटींचे योगदान

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी ‘पीएम केअर्स फंडा’चे २२०० कोटींचे योगदान

  • मार्च २०२० मध्ये कोरोना काळाच्या आपत्कालीन परिस्थितीत जनतेच्या मदतीसाठी ‘पीएम केअर्स फंड’ स्थापन करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर पीएम केअर्स फंडामधून कोरोना लसीकरण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात २२०० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे, अशी माहिती अर्थ विभागाचे (खर्च) सचिव टी. व्ही. सोमनाथन यांनी दिली. लसीकरणातील पहिल्या टप्प्यातील हा निधी खर्चाच्या ८० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचेही त्यांनी सांगितले.
  • देशातील फ्रंटलाईन वर्कर्सचे लसीकरण पहिल्या टप्प्यात केले जात आहे.
  • पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पात कोविड लसीकरणासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ३५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. चालू वर्षाचा अर्थसंकल्प हा कोरोनाच्या आधी सादर करण्यात आला होता. त्यामुळे त्यामध्ये लसीकरणासाठी स्वतंत्र तरतूद नव्हती. अशा परिस्थितीत जानेवारी ते मार्च या कालावधीत लसीकरणाच्या ८२ टक्क्यांहून अधिक खर्च पीएम केअर्स फंड करत आहे. या तीन महिन्यांचा खर्च २७०० कोटी रुपये अपेक्षित आहे. त्यातील एक भाग हा आरोग्य मंत्रालयाकडून येत आहे.
  • पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांचे लसीकरण होणार आहे. याचा संपूर्ण खर्च केंद्र सरकार करत आहे. यामध्ये लसीकरणाच्या तीन कोटी बॅचसाठी ४८० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात आली आहे.
  • पीएम केअर्सला वैयक्तिक, संस्था, कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (सीएसआर) फंड, परदेशी व्यक्ती/संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम यांच्याकडून मिळालेल्या देणग्यांद्वारे वित्तपुरवठा केला जातो.
  • पीएम केअर्सची नोंदणी २७ मार्चला करण्यात आली आहे. त्यानुसार २८ मार्च २०२० ला या फंडाची स्थापना करण्यात आली. गृहमंत्री, संरक्षणमंत्री, अर्थमंत्री या फंडाचे विश्वस्त आहेत. आपले पद, नाव आणि अधिकाऱ्यांच्या मदतीने या फंडाचे विश्वस्त असणाऱ्या ह्या व्यक्ती या पदासाठी मानधन घेत नाहीत.
  • हा फंड आरटीआय कायदा, २००५ नुसार सार्वजनिक प्राधिकरण नाही. तसेच या फंडात देगणी देणाऱ्यांना प्राप्तीकरातून सूट देण्यात आली होती. त्यामुळे विरोधकांनी त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now