केंद्रसरकारच्या कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती

केंद्रसरकारच्या कृषी कायद्यांना तात्पुरती स्थगिती

  • देशभरात शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे वादग्रस्त ठरलेल्या केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांना न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
  • या वादावर तोडगा काढण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला आहे.
  • समितीत कृषी शास्रज्ञ अशोक गुलाटी, आंतरराष्ट्रीय खाद्यान्न धोरण संशोधन संस्थेसाठी काम करणारे प्रमोद जोशी, बी. एस. मान, व अनिल धनवंत यांचा समावेश करण्यात आहे.

 

समिती स्थापन करण्यामागचा उद्देश :

 

  • निर्माण झालेली कोंडी सोडवण्यासाठी शेतकरी संघटना आणि सरकारमध्ये चर्चा करण्यासाठी ही समिती बनविण्यात आली आहे.

 

सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

 

  • कृषी कायदे चर्चा न करताच मंजूर केल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. सरकारशी गेल्या महिनाभर चर्चा सुरू असूनही काहीही तोडगा निघत नसल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
  • आंदोलनात महिला लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक का? असा सवाल न्यायालयाने आंदोलनकर्त्यांना केला.
  • हिंसाचाराची परिस्थिती उद्‌भवल्यास प्रत्येक व्यक्ती जबाबदार

 

कोणत्या कायद्यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे?

 

अ) शेतकरी उत्पादने व्यापार व वाणिज्य (प्रोत्साहन व सुविधा) विधेयक, २०२०

ब) शेतकरी (सशक्तीकरण आणि संरक्षण) किंमत आश्वासन आणि कृषी सेवा करार विधेयक, २०२०

क) अत्यावश्यक वस्तू (दुरुस्ती) विधेयक, २०२०

नविन कृषी कायद्यांनुसार सरकार व शेतकरी किंवा आंदोलकांचे काय म्हणणे आहे?

सरकार शेतकरी
१) कृषी उत्पन्न बाजार समितीने (APMC) मान्यता दिलेल्या बाजारांबाहेरही मालाची खरेदी – विक्री करता येईल. बाजार समित्या हद्दपार झाल्यास मध्यस्थ, आडत तसेच किमान आधारभूत किंमतीची (MSP) यंत्रणा मोडकळीस येईल.
२) कंत्राटी शेतीमुळे शेतकऱ्यांना पिकासाठी घाऊक विक्रेते, प्रोसेसिंग इंडस्ट्री किंवा कंपनीसोबत करार करता येईल. परिणामी, मध्यस्थांना दूर करून शेतकरी पूर्ण नफा मिळवू शकतात. कंत्राटी व्यवस्थेत शेतकरी वाटाघाटी करू शकतील का? लहान शेतकऱ्यांशी करार करण्यात कंपन्या तयार असतील का?
केंद्र सरकारने आता डाळी, कडधान्ये, तेलबिया, कांदा, बटाटे यांना अत्यावश्यक यादीतून वगळल्यामुळे साठा करण्यावर निर्बंध राहणार नाहीत, खासगी गुंतवणूक वाढेल आणि किंमती स्थिर राहण्यास मदत होईल. मोठ्या कंपन्या वाटेल तेवढा साठा करू शकतील तसेच शेतकऱ्यांना कंपन्यांच्या सांगण्याप्रमाणे उत्पादन घ्यावे लागेल.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now