ऑक्सिजनसाठी ‘पीएम केअर’

ऑक्सिजनसाठी ‘पीएम केअर’

  1. देशात कोरोनाची दुसरी लाट सुरू असताना पीएम केअर्स निधीतून देशातील सरकारी रुग्णलयांत 551 प्राणवायू निर्मिती प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत.
  2. या वैद्यकीय कारणासाठी लागणारा प्राणवायू सरकारी रुग्णालयांच्या प्रकल्पातच तयार होणार आहे.
  3. स्विंग ॲण्ड स्पॉर्प्सन (अधिशोषक) पद्धतीचे हे प्रकल्प असणार आहेत.
  4. हे प्रकल्प प्राणवायू उपलब्धता वाढवणार असून जिल्हा पातळीवर त्याचा फायदा होणार आहे.
  5. हे प्राणवायू निर्मितीसाठी समर्पित असे प्रकल्प असतील तसेच राज्ये व केंद्रशासित प्रदेशात जिल्हा मुख्यालयांच्या ठिकाणी हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.
  6.  पीएम केअर निधीतून यंदाच्या वर्षी आधीच 201.58 कोटी रुपये पीएसए प्राणवायू प्रकल्पांसाठी मंजूर करण्यात आले होते.
  7. त्यातील तरतूद ही 161 प्रकल्पांसाठी होती.
  8. सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या ठिकाणी या प्राणवायू प्रकल्पांना परवानगी देण्यात आली होती.

प्रत्येक जिल्हा रुग्णालयात सुविधा

  1. पीएसए प्राणवायू प्रकल्प सुरू करण्यामागे मुख्य उद्देश हा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सरकारी रुग्णालयात प्राणवायू पुरवठा सुरळित ठेवणे हा आहे.
  2. प्रत्येक जिल्हा रुग्णालयात अशी प्राणवायू क्षमता ठेवली जाणार आहे.
  3. ही रुग्णालये स्वतःच त्यांची गरज भागवू शकेल एवढा प्राणवायू तयार करू शकतील.
  4. वैद्यकीय प्राणवायू हा वेगळा राहील.
  5. प्रदीर्घ काळ ही यंत्रणा सुलभपणे चालू शकेल व त्यामुळे आजारी रुग्णांना अखंडपणे प्राणवायू पुरवठा करता येणार आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now