आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन

आयुष्मान भारत डिजिटल हेल्थ मिशन

  • २७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मिशन म्हणजेच आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ मिशनची घोषणा केली.
  • देशातील आरोग्य व्यवस्थेला डिजिटल करण्यामधील हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे.
  • गेल्या वर्षी १५ ऑगस्टला मोदींनी लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय डिजिटल आरोग्य मोहिमेस प्रायोगिक तत्वावर सुरुवात केली होती. यानुसार ही योजना सहा केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू आहे. (चंदिगड, लडाख, दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव, पुद्दुचेरी, अंदमान व निकोबार आणि लक्षद्वीप)
  • भारतातील आरोग्यव्यवस्थेत क्रांती घडवण्याची ताकद यात आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. आयुष्मान भारत योजनेअंतर्गत सदर योजना कार्य करेल.
  • या योजनेअंतर्गत देशातील सर्व नागरिकांच्या आरोग्यविषयक नोंदी एका डेटाबेस वर एकत्र करून सर्व नागरिकांना एक डिजिटल हेल्थ कार्ड पुरवण्यात येईल.
  • हेल्थ कार्डमुळे नागरिकांना आपली आरोग्यविषयक सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. डॉक्टरांकडे जाताना कुठलेही कागदपत्र घेऊन जाण्याची गरज राहणार नाही. तसेच ‘डीजीडॉक्टर’ या तरतुदीमुळे टेलिमेडिसीनद्वारे रुग्णांना हव्या त्या डॉक्टरकडून उपचार घेणे शक्‍य होणार आहे. 
  • डॉक्टरांनाही  हेल्थ कार्डमुळे रुग्णांची सर्व माहिती मिळणार असल्याने उपचार करण्यास मदत होणार आहे.
  • योजनेअंतर्गत नागरिकांना आधारच्या धर्तीवर एक युनिक आरोग्य आयडी मिळेल.
  • प्रत्येक नागरिकासाठी तयार केलेले हे आयडी हे त्याचे आरोग्य खाते म्हणून काम करेल. यामुळे नागरिकांच्या वैयक्तीक आरोग्य नोंदी केल्या जाऊ शकतात आणि मोबाइल ॲप्लिकेशनच्या मदतीने त्यात बदल/नवीन नोंदी करून त्या पाहिल्या जाऊ शकतात.
  • या डिजिटल मिशनमुळे आता देशभरातील रुग्णालये  डिजिटली एकमेकांशी जोडली जातील. प्रत्येक नागरिकाचे आरोग्य रेकॉर्ड डिजिटली सुरक्षित केले जातील.
  • हेल्थ कार्ड बनवून घ्यायचं की नाही याचे पूर्ण स्वातंत्र्य नागरिकांना आहे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now