आठ नवीन राज्यपालांची राष्ट्रपतींद्वारा नियुक्ती

आठ नवीन राज्यपालांची राष्ट्रपतींद्वारा नियुक्ती

 

  • संदर्भ :

 

    • भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आठ राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती केली आहे.

 

  • राज्यपाल व राज्य :
क्र. राज्यपाल राज्य
१) श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई गोवा
२) श्री. सत्यदेव नारायण आर्य त्रिपुरा
३) श्री. रमेश बैस झारखंड
४) श्री. थावरचंद गेहलोत कर्नाटक
५) श्री. बंडारू दत्तात्रेय हरियाणा
६) डॉ. हरिबाबू कंभमपती मिझोराम
७) श्री. मंगूभाई छगनभाई पटेल मध्यप्रदेश
८) श्री. राजेंद्र विश्वनाथ अर्लेकर हिमाचल प्रदेश

परीक्षाभिमुख :

राज्यपाल (कलम १५३ ते १६२)

  • कलम १५३ : प्रत्येक राज्यास एक राज्यपाल असेल.
  • एकच व्यक्ती दोन किंवा अधिक राज्यांकरिता राज्यपाल म्हणून नियुक्त केली जाईल. (७वी घटनादुरुस्ती, १९५६)
  • कलम १५४ : राज्याचे सर्व कार्यकारी अधिकार राज्यपालाच्या हाती असेल.
  • कलम १५५ : राज्यपालाची नेमणूक राष्ट्रपतींकडून सहीनिशी व स्वमुद्रांकित अधिपत्राद्वारे केली जाईल.
  • कलम १५६ : राज्यपालाचा पदावधी

१) राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत पद.

२) राष्ट्रपतीस संबोधून लेखी राजीनामा देऊ शकतो.

३) घटनेत राज्यपालांना पदावरून दूर करण्याचे कोणतेही आधार सांगितलेले नाही.

  • कलम १५७ : पदासाठी अर्हता

१) भारताचा नागरिक असावा.

२) वयाची ३५ वर्षे पूर्ण असावीत.

  • कलम १५८ : पदाच्या शर्ती
  • कलम १५९ : शपथ व प्रतिज्ञा
  • कलम १६० : विशिष्ट परिस्थितीत पार पाडावयाची राज्यपालाची कार्य
  • कलम १६१ : क्षमादानाचा अधिकार

 

राज्यपालाचे घटनात्मक स्वेच्छाधीन अधिकार :

 

अ) एखादे विधेयक राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवणे.

ब) राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याबाबत राष्ट्रपतींकडे शिफारस करणे.

क) मुख्यमंत्र्यांकडून राज्याच्या प्रशासकीय व कायदेविषयक बाबींसंबंधीची माहिती मागणे.

ड) आसाम, मेघालय, त्रिपुरा आणि मिझोराम या क्षेत्रात सरकारने खनिज उत्खननासाठी दिलेल्या परवान्यांतून मिळणाऱ्या रॉयल्टीमधून स्वायत्त आदिवासी परिषदेला देय रक्कम निश्चित करणे.

⚠️⚠️Notice: The Courses are unavailable for purchase from 1st of June 2025 ⚠️⚠️

This will close in 20 seconds

Contact Us

    Enquire Now