६ जी तंत्रज्ञान
- सरकारने सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (C-DOT)ला ६जी तंत्रज्ञानावर काम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
- जागतिक बाजारपेठेत ६जी नेटवर्कच्या बाबतीत मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्यासाठी हे काम वेळेत सुरू करणे अपेक्षित आहे.
- नेक्स्ट जनरेशन टेलिकॉम टेक्नॉलॉजी (६जी) ही ५जी पेक्षा ५० पट अधिक वेगवान आहे.
- २०२८ ते २०३० दरम्यान हे व्यावसायिकरीत्या लॉन्च होण्याची अपेक्षा आहे.
६जी विषयी :
- हे ५जी सेल्युलर तंत्रज्ञानाचा उत्तराधिकारी आहे. जो ५जी पेक्षा जास्त नेटवर्क वारंवारिता (फ्रीक्वेन्सी) वापरण्यास सक्षम असतील आणि खूप कमी विलंबासह बरीच उच्च क्षमता प्रदान करतील.
- ६जी तंत्रज्ञानाचे मुख्य ध्येय एक मायक्रोसेकंद लेटन्सी कम्युनिकेशनला (संप्रेषण) समर्थन देणे, हे असेल.
- हे १ टेराबाईट प्रति सेकंद डेटा दरांना समर्थन देईल.
- हे तंत्रज्ञान इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमच्या इन्फ्रारेड व लघु लहरींच्या दरम्यान असलेल्या टेराहर्ट्झ लहरींच्या ब्रँडचा वापर करण्याचा प्रयत्न करीत आहे.
महत्त्व
- ६जी तंत्रज्ञान इमेजिंग, उपस्थित तंत्रज्ञान तसेच स्थान जागरूकतेतील सुधारणा सुलभ करेल.
- सापेक्ष इलेक्ट्रोमॅग्नेटिक शोषण दर निश्चित करण्यासाठी सब-मिमी (sub-mm) लहरी (१ मिमीपेक्षा कमी तरंगलांबी) आणि वारंवारिता निवडकतेचे संमिश्रण वायरलेस सेन्सिंग तंत्रज्ञानात संभाव्य प्रगती करू शकते.
- यामुळे डिजिटल क्षमतेच्या प्रचंड संचासह साध्या, वापरण्यायोग्य व वापरण्यास सुलभ अशा उपकरणांचा उदय होण्यास मदत होईल.
- तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelligence) आणि मोठ्या प्रमाणावरील समांतर संगणकीय आर्किटेक्चर यामुळे वाहतूक व शेड्यूलिंग ऑपरेशन्स संबंधित समस्या सोडविण्यास मदत होईल.
वापर
- धोक्याचा शोध
- आरोग्य
- कायद्याची अंमलबजावणी आणि सामाजिक पतप्रणाली यासारख्या क्षेत्रात योग्य निर्णय घेण्यासाठी
- हवा गुणवत्ता मोजमाप
६जी नेटवर्क
- सॅमसंग, हुवेई, एलजी यांसारख्या कंपन्या सध्या ६जी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहेत.
- २०२८मध्ये जगातील पहिले व्यावसायिक ६जी नेटवर्क तैनात करण्याचे दक्षिण कोरियाचे उद्दिष्ट आहे.
आव्हाने
- मुख्य तांत्रिक आव्हाने जसे-ऊर्जा कार्यक्षमता, हवा किंवा पाण्याच्या थेंबामुळे सिग्नल क्षीण होणे टाळणे; त्याचप्रमाणे मजबूत सायबर सुरक्षा व डेटा संरक्षण यंत्रणेद्वारे एंड-टू-एंड सुरक्षा राखणे.
- मल्टि THz वारंवारिता वापरता येणारे सेमिकंडक्टिंग साहित्य आपल्याकडे उपलब्ध नाही.
- वातावरणातील पाण्याची वाफ THz लहरी अवरोधित करून परावर्तित करतात. त्यामुळे गणिततज्ज्ञांना डेटाला त्यांच्या अंतिम स्थानापर्यंत पोहोचविता येणारे जटिल मॉडेल डिझाईन करावे लागेल.
सेंटर फॉर डेव्हलपमेंट टेलिमॅटिक्स (C-DOT)
- स्थापना : १९८४
- भारतातील दूरसंचार विभागाचे एक स्वायत्त दूरसंचार अनुसंधान आणि विकास केंद्र आहे.
- भारताच्या डिजिटल इंडिया, भारतनेट, स्मार्टसिटीज यांसारख्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सी-डॉट कटिबद्ध आहे.