५९ चीनी मोबाइल अॅप्सवर बंदी
- भारताच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेसाठी धोकादायक असलेल्या ५९ चीनी मोबाइल अॅप्सवर सरकारने बंदी घातली आहे.
- इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईईटी), माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६९ A अंतर्गत माहिती तंत्रज्ञानाच्या संबंधित तरतुदी (ब्लॉक करण्यासाठी प्रक्रिया व सुरक्षितता) नियम २००९ नुसार अॅप्सवर बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
- ब्लॉक केलेले टिकटॉक, हेलो, वेचॅट, यूसी ब्राउझर, शेअर इट आणि कॅमस्कॅनर असे सर्व अॅप्स चिनी आहेत.
- वास्तविक नियंत्रण रेषेवर (एलओसी) संघर्ष सुरू झाल्यानंतर भारत आणि चीनमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला गेला आहे.
- इंडियन सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटर (I4C), गृह मंत्रालय (एमएचए) च्या धोकादायक अॅप्सवर बंदी घालण्याबाबतच्या संपूर्ण शिफारसींची या निर्णयाद्वारे अंमलबजावणी झाली आहे.
पार्श्वभूमी : एमईआयटी आणि कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (सीईआरटी-इन) यांना अँड्रॉइड आणि आयओएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असलेल्या काही मोबाइल अॅप्सचा गैरवापर केल्याबद्दल, अनेक वापरकर्त्यांकडील डेटा अनधिकृत पद्धतीने सर्व्हरवर हस्तांतरित केल्यासंबंधीच्या अनेक तक्रारी आल्या होत्या.