२०२१ ची आयपीएल भारतातच होणार ९ एप्रिल ते ३० मे दरम्यान हे सामने रंगणार
- या वर्षीच्या आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून, यंदा ही स्पर्धा भारतातच होणार आहे.
- देशातील सहा शहरांमध्ये हे सामने रंगणार आहेत. यामध्ये मुंबई, अहमदाबाद, बंगळूरू, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता यांचा समावेश आहे.
- हे सामने प्रामुख्याने भारतात होताना होम अँड अवे पद्धतीने होत असत. मात्र यावेळी कोरोना महामारीमुळे स्पर्धा मर्यादित ठिकाणी घेण्याचे ठरले. कोणताही संघ घरच्या मैदानावर एकही लढत खेळणार नाही.
- सहा ठिकाणी ह्या साखळीतील स्पर्धा होणार असल्या तरी प्रत्येक संघ जास्त प्रवास टाळण्यासाठी चारच ठिकाणी सामने खेळणार आहे. ही स्पर्धा सुरुवातीस तरी बंदिस्त स्टेडियममध्येच खेळवण्याचा निर्णय झाला आहे.
- गतविजेते मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यात ९ एप्रिलला चेन्नईत होणाऱ्या लढतीने स्पर्धेस सुरुवात होणार आहे. प्ले ऑफच्या लढती तसेच अंतिम सामना ३० मे ला अहमदाबादला होणार आहे. आयपीएलचे हे चौदावे पर्व आहे. तेरावे पर्व मागील वर्षी यूएईमध्ये पार पडले होते.
- ११ डबलहेडर्स म्हणजे एकाच दिवशी दोन सामने असतील. दुपारचे सामने साडेतीन वाजता सुरू होतील. तर रात्रीचे सामने साडेसात वाजता सुरू होतील. कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता सुरुवातीचे सामने प्रेक्षकांविना खेळवले जाणार आहेत. परिस्थिती सुधारल्यास, प्रेक्षकांना सामना पाहण्याची मुभा मिळू शकते. या संदर्भात नंतर निर्णय घेतला जाईल.
- यावेळी स्पर्धेत ५६ साखळी लढती होतील. त्यातील प्रत्येकी दहा मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि बंगळूरू येथे होतील. तर अहमदाबाद आणि दिल्लीत प्रत्येकी आठ सामने होतील.
आयपीएल बद्दल थोडक्यात
- IPL – Indian Premier League (Twenty 20)
- सुरुवात – २००८
- एकूण संघ – आठ
- सर्वाधिक विजेता – मुंबई इंडियन्स (पाच वेळा)
- सर्वाधिक धावा – विराट कोहली (५८७८)
- सर्वाधिक बळी – लसिथ मलिंगा (१७०)
- पहिले विजेते – राजस्थान रॉयलस (२००८)
- दुसरे विजेते – डेक्कन चार्जर्स (२००९)
- बारावे विजेते – मुंबई इंडियन्स (२०१९)
- तेरावे विजेते – मुंबई इंडियन्स (२०२०)