२०१९ मधील अपघाती मृत्यू आणि आत्महत्या
- १ सप्टेंबर २०२० रोजी नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो (NCRB) गृहमंत्रालयाने ‘अपघाती मृत्यू आणि आत्महत्या इन इंडिया २०१९’ हा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला.
- १९६७ मध्ये सुरू झालेल्या NCRB मालिकेची ५३ वी आवृत्ती आहे.
- भारत सरकारकडे अपघाती आणि आत्महत्येला मृत्यूशी झुंज संबंधित ही एकमेव डेटाबँक आहे.
- स्टेट क्राइम रेकॉर्ड ब्यूरो व डिस्ट्रिक्ट क्राइम रेकॉर्ड ब्यूरो यांच्याकडून एकत्रित केलेल्या अपघातांमुळे आणि आत्महत्यांमुळे होणार्या मृत्यूची माहिती NCRB ला पाठवून हा अहवाल तयार केला आहे.
- १० लाख किंवा त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या शहरांचा डेटा स्वतंत्रपणे गोळा केला जातो.
- या अहवालात पीडितांचे वयोगटानुसार व लिंगनिहाय तपशील देण्यात आले आहेत.
अहवालात अपघातातील मृत्यूच्या कारणाचे दोन गट केले आहेत.
१) २०१९ मध्ये महाराष्ट्र १८९१६ अपघाती मृत्यू झाले आहेत.
२) २०१९ मध्ये झालेल्या आत्महत्यांपैकी दोन तृतीयांश आत्महत्या या वार्षिक उत्पन्न १ लाखाहून कमी असलेल्या श्रेणीतील आहे.
- रोजंदारीवर काम करणार्यांमधील आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे. जे आत्महत्येमुळे मृत्यू पावलेल्या २३% आहे. बळी पडलेले बहुतेक १८-४५ वयोगटातील आणि सुशिक्षित आहेत.
- भारतातील आत्महत्यांपैकी ७.४% शेतकरी आहेत.
- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि त्यानंतर तेलंगणा या राज्यांत भारतात शेती क्षेत्रात सर्वाधिक आत्महत्या होत आहेत.
एनसीआरबी बद्दल :
- संचालक : रामफळ पवार (आयपीएस)
- मुख्यालय : नवी दिल्ली