२०१८ आशियाई स्पर्धा : भारतीय मिश्र रिले संघाला सुवर्णपदक
- २०१८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय रिले संघाने
- ४ × ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक जिंकले होते. बहारीन संघाने सुवर्णपदक नावावर केले होते. परंतु त्याची धावपटू केमी अॅडकोया डोपिंगमध्ये दोषी आढळली असल्याने त्यांना अपात्र ठरवण्यात आले आणि त्यामुळे भारताचे रौप्यपदकाचे रूपांतर सुवर्णपदकात झाले.
- भारताच्या या संघात हिमासह मोहम्मद अनास, पूणम्मा आणि आरोकिया राजीव यांचा समावेश होता. आता भारताच्या खात्यात ८ सुवर्णपदकांसह २० पदके झाली आहेत. या निर्णयाने मिश्र गटातील पहिले विजेते हा मानही भारताला मिळाला.
- हिमा दासने या स्पर्धेत ४ × ४०० मीटर रिले महिला गटात सुवर्ण, ४०० मीटर शर्यतीत रौप्यपदक तर ४ × ४०० मीटर मिश्र रिले गटात सुवर्णपदक पटकावले.
- ४ × ४०० मीटर मिश्र रिले गटात भारतीय खेळाडूंनी ३ मिनिटे १५.७१ सेकंदाची वेळ नोंदवली.