१६८ जीबीचे (गिगाबाइट) चंद्राचे सुस्पष्ट छायाचित्र
- सोळा वर्षाच्या हौशी खगोलप्रेमी प्रथमेश जाजू यांनी तब्बल ५० हजारांहून अधिक छायाचित्रे एकत्र करून १८६ जीबीचे (गिगाबाइट) सुस्पष्ट चंद्रबिंब टिपण्याची कामगिरी साधली आहे.
- प्रथमेश जाजू विद्याभवन या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत इयत्ता दहावीत शिकत आहे.
- त्याने दुर्बिणीचा वापर करून मोझेक स्पेसिंग या तंत्राद्वारे चंद्राचे छायाचित्र टिपले आहे.
- चंद्राचे छायाचित्र १८६ जीबीचे असल्याने हे छायाचित्र कितीही झूम केले तरी धूसर (पिक्सेलाईट) होणार नाही.
- मोझेक स्पेसिंग या तंत्राद्वारे काढलेल्या छायाचित्रात छोटे घटकही सुस्पष्ट दिसतात. चंद्रावरील विविध क्षारांचे रंगही स्पष्ट दिसत आहेत.