१५ नोव्हेंबर आदिवासी गौरव दिन म्हणून साजरा
- केंद्र सरकारने भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाचा भाग म्हणून शूर आदिवासी स्वातंत्र्यसैनिकांचा सन्मान करण्यासाठी १५ नोव्हेंबर हा दिवस ‘आदिवासी गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यास मंजुरी दिली आहे.
महत्त्व
- सांस्कृतिक वारसा जतन करण्यासाठी आणि शौर्य, आदरातिथ्य आणि राष्ट्रीय अभिमानाच्या भारतीय मूल्यांच्या संवर्धनासाठी आदिवासींच्या प्रयत्नांना मान्यता देण्यासाठी दरवर्षी ‘आदिवासी गौरव दिन’ आयोजित केला जाईल.
- संथाल, तामर, कोल, भिल्ल, खासी आणि मिझो यांसारख्या आदिवासी समुदायांच्या अनेक चळवळींनी भारताच्या स्वातंत्र्यलढ्यास बळकटी दिली आहे.
- याप्रसंगी रांची येथे आदिवासी स्वातंत्र्यसैनिक संग्रहालयाचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.
- तसेच आदिवासी लोकांचा ७५ वर्षांचा गौरवशाली इतिहास, संस्कृती आणि कर्तृत्वे साजरे करण्यासाठी आणि त्यांचे स्मरण करण्यासाठी भारत सरकारने १५ नोव्हेंबर ते २२ नोव्हेंबर २०२१ आठवड्याभराचा उत्साह साजरा करण्यात आला.
काही महत्त्वपूर्ण आदिवासी स्वातंत्र्यसैनिक
१) बिरसा मुंडा :
- जन्म – १५ नोव्हेंबर १८७५
- उलगुन लढा – ब्रिटिश वसाहतीवादी व्यवस्थेच्या शोषक व्यवस्थेविरुद्ध व ब्रिटिशांच्या दडपशाहीविरुद्ध शौर्याने लढा.
२) शहीद वीर नारायण सिंह :
- छत्तीसगडमधील सोनाखानचे अभिमान
- १८५६ च्या दुष्काळानंतर त्यांनी व्यापाऱ्यांचे धान्य लुटून गरिबांत वाटले.
- १८५७ च्या स्वातंत्र्य लढ्यातील छत्तीसगडचे पहिले हुतात्मा
३) श्री अल्लुरी सीता रामा राजू :
- जन्म – ४ जुलै १८९७ (माेगल्लू, भीमावरम, आंध्रप्रदेश)
- रामप्पा बंडाचे नेतृत्व : विशाखापट्टणम आणि पूर्व गोदावरी जिल्ह्यातील आदिवासी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध बंड करण्यास संघटित केले.
४) राणी गॅडिनलेऊ :
- नागा समुदायाच्या आध्यात्मिक व राजकीय नेत्या
- वयाच्या १३व्या वर्षी भाऊ हैपो जडोनांगच्या ‘हेरका’ या धार्मिक चळवळीत सहभाग
५) सिद्धू आणि कान्हू मुर्मू :
- ३० जून १८५५ रोजी दोन्ही बंधूंनी १०,००० संथाल एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध बंड
- त्यांच्या बहिणी फुलो आणि झानो यांचाही सक्रिय सहभाग
- याचे परिणाम स्वरूप म्हणजे स्वतंत्र संथाल प्रांताची निर्मिती