१३वी ब्रिक्स शिखर परिषद

१३ वी ब्रिक्स शिखर परिषद

  • ९ सप्टेंबर २०२१ रोजी आभासी स्वरूपात १३व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्ली येथे करण्यात आले होते.
  • २०१२ (नवी दिल्ली), आणि २०१६ (गोवा) नंतर भारतात तिसऱ्यांदा ही परिषद पार पडली.
  • यंदा ब्रिक्सच्या स्थापनेला १५ वर्षे पूर्ण होत आहेत, यामुळे यावर्षीची थीमही ब्रिक्सच्या १५ वर्षांच्या कार्यकाळास अधोरेखित करणारी होती.
  • थीम : ‘ब्रिक्स @ १५ : सातत्य, एकत्रीकरण आणि सहमतीसाठी आंतर-ब्रिक्स सहकार्य’

‘BRICS @ 15 : Intra – BRICS Cooperation for Continuity, Consolidation and Consensus’

  • भारताने या परिषदेकरिता चार प्राधान्य क्षेत्रांसाठी रूपरेषा बनविली होती, ती पुढीलप्रमाणे आहेत :

अ) बहुक्षेत्रीय प्रणालीतील सुधारणा

ब) दहशतवादास विरोध

क) शाश्वत विकास ध्येय साध्य करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

ड) परस्पर संबंध दृढ करण्यासाठी विनिमय उपक्रम

 

चर्चेतील इतर महत्त्वाचे मुद्दे

 

१) बहुपक्षीय प्रणालीतील सुधारणा: पाचही देशांच्या परराष्ट्रमंत्र्यांनी बहुपक्षीय प्रणालीस बळकट करण्यासाठी व त्यात सुधारणा करण्याच्या तत्त्वास संयुक्तपणे सहमती दर्शविली.

२) यूएनएससी सुधारणा : संयुक्त राष्ट्राच्या प्रमुख अंगामध्ये सुधारणा करण्यासाठी ही शिखर परिषद आयोजित केली गेली, ज्यात संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत काही बदल करून त्यास जीवन प्रदान करण्याचा समावेश होता.

३) अंतराळ आणि हवामान सहकार्य करार: अंतराळ संस्था आणि रिमोट सेन्सिंगमुळे जागतिक हवामान बदल, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण संरक्षण, अन्न आणि पाण्याची टंचाई टाळण्यासाठी संशोधन क्षमता वाढण्यास मदत होईल.

    • तसेच या चर्चेदरम्यान नेत्यांनी संयुक्त राष्ट्राच्या हवामान बदलावरील परिषदेनुसार (UNFCCC) क्योटो प्रोटोकाॅल व पॅरिस कराराची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यास वचनबद्धता दर्शविली.

४) कृषी: कृषी सहकार्यासाठी २०२१-२४ हा ॲक्शन प्लॅन स्वीकारण्यात आला असून कृषी संशोधन व्यासपीठही सुरू केले आहे.

५) हरित पर्यटन: अधिक शाश्वत, लवचिक आणि सर्वसमावेशक पर्यटन क्षेत्रास प्रोत्साहन देण्यासाठी हरित पर्यटन.

६) आंतर-ब्रिक्स व्यापार: सीमा शुल्क विभागातील सहकार्य वाढविण्यावर भर.

७) न्यू डेव्हलपमेंट बँकेच्या सदस्यत्वात व्याप्ती: नव्याने सामील सदस्य देश – बांग्लादेश, संयुक्त अरब अमिरात व उरुग्वे.

ब्रिक्स (BRICS):

    • सदस्य देश: ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका (२०१०)
    • गोल्डमन सॅक्स या कंपनीचे अर्थतज्ज्ञ जिम ओ-नील यांनी २००१ मध्ये त्यांच्या बिल्डिंग बेटर ग्लोबल इकॉनॉमिक ब्रिक्स’ प्रकाशनात सर्वप्रथम ब्रिक्स या शब्दाला नावारूपास आणले; ज्यात ब्राझील, रशिया, भारत आणि चीन या देशांचा समावेश होता.
    • २००९ मध्ये या संघटनेची पहिली परिषद पार पडली आणि २०१०मध्ये संस्थात्मक रूपात ही संघटना अस्तित्वात आली.
    • आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएसएफ) किंवा जागतिक बँक यांना पर्याय म्हणून ही संघटना नावारूपाला आली होती.
    • पाश्चिमात्त्य जग प्रामुख्याने जगातील महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या प्रभुत्वाखालील वित्तीय संघटनांच्या मक्तेदारीला आव्हान देण्यासाठी ही संघटना स्थापन करण्यात आली.
    • यातील पाचही देश जी-२०चे सदस्य देश आहेत.
    • विकसनशील देशांचे नेतृत्व करणारी ब्रिक्स ही महत्त्वपूर्ण संघटना आहे.
    • जगाच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे ४२%, जीडीपीचा २३%, क्षेत्रफळानुसार ३०% जागतिक व्यापारानुसार १८ टक्के वाटा हा ब्रिक्स देशांचा आहे.
    • ब्रिक्स देशांचा एकत्रित जीडीपी १६.६ ट्रिलियन डॉलर्स असून याची शिखर परिषद भारतात भरविणे, भारतासाठी महत्त्वपूर्ण आहे.
    • तसेच यंदाची परिषद अशावेळी भरविली गेली आहे, जेव्हा या गटातील दोन देशांत (भारत आणि चीन) गेल्या सहा महिन्यांपासून पूर्व लडाख सीमाप्रश्नावरून संघर्ष चालू आहे.
    • ब्रिक्सच्या सहाव्या परिषदेत (२००४) न्यू डेव्हलपमेंट बँक स्थापनेच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
    • १९ जुलै २०२० ब्रिक्सच्या मानद सल्लागारपदी २०२० ते २०२३ या कालावधीसाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी टीना दाबी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

 

मागील ब्रिक्स परिषदा:

 

क्र.

परिषद वर्ष ठिकाण देश

१.

पहिली २००९ येकाटेरिनबर्ग

रशिया

२.

सहावी २०१४ फोर्टालेसा

ब्राझील

३.

सातवी २०१५ उफा

रशिया

४.

आठवी २०१६ गोवा

भारत

५.

नववी २०१७ झियामेन

चीन

६.

दहावी २०१८ जोहान्सबर्ग

दक्षिण आफ्रिका

७.

अकरावी २०१९ ब्राझिलिया

ब्राझील

८. बारावी २०२० सेंट पीटर्सबर्ग

रशिया

Contact Us

    Enquire Now