हेरिटेज ट्री धोरण
- या धोरणानुसार ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना ‘हेरिटेज ट्री’ अर्थात प्राचीन वृक्षाचा दर्जा मिळणार आहे.
- नवीन वृक्ष लागवड करतांना प्राचीन आणि अतिप्राचीन वृक्षांचे जतन करण्याच्या दृष्टीनेच ‘हेरिटेज ट्री’ संकल्पना राबविली आहे.
- पाच वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची २०० हून अधिक झाडे तोडण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य वृक्ष प्राधिकरणाकडे मान्यतेसाठी पाठवणे आवश्यक
- दर ५ वर्षांनी गणना करण्याचे काम स्थानिक वृक्ष प्राधिकरणाकडून
- यामध्ये हेरिटेज वृक्षांची गणना आणि संवर्धनाच्या कामाचाही समावेश आहे.
- ३३ टक्के वनक्षेत्रांच्या तरतुदींची पूर्तता करण्याच्या उद्देशाने हे धोरण राबविण्यात आले आहे.